महाराष्ट्र

maharashtra

नाशिकनंतर परभणीतही अजब प्रकार! लस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला चिकटताय नाणे

By

Published : Jun 11, 2021, 4:48 PM IST

नाशिक येथील 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला कोरोनाची लस घेतल्यानंतर धातूचे नाणे आणि स्टेनलेसस्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचीच पुनरावृत्ती आज परभणीत झाल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणचे 41 वर्षीय गजानन पाटेकर यांना देखील हाच अनुभव आला आहे.

आश्चर्याम
आश्चर्याम

परभणी -नाशिक येथील 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला कोरोनाची लस घेतल्यानंतर धातूचे नाणे आणि स्टेनलेसस्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचीच पुनरावृत्ती आज परभणीत झाल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणचे 41 वर्षीय गजानन पाटेकर यांना देखील हाच अनुभव आला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे शरीर धातूची नाणी आणि काही स्टीलच्या वस्तू आकर्षून घेत आहेत. मात्र याचा त्यांना कुठलाही त्रास होत नसल्याचे ते सांगत आहे. यामागील विज्ञान काय आहे? हे नेमके सांगणे कठीण असले तरी लसीकरणानंतर हा प्रकार झाल्याचा दावा गजानन पाटेकर करत आहेत.

नाशिकनंतर परभणीतही अजब प्रकार! लस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला चिकटताय नाणे

गोंधळून टाकणारा प्रकार

चष्म्याच्या व्यवसायात असलेले गजानन पाटेकर यांनी 7 मे रोजी कोरोनाची 'कोविशील्ड' ही लस घेतली आहे. मात्र, काल गुरुवारी नाशिक येथील अरविंद सोनार या 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने लस घेतल्यानंतर त्यांनी शरीराला धातूची नाणी आणि स्टेनलेस स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा दावा केल्याची बातमी पाटेकर यांनी पाहिली. त्यानंतर सहजच म्हणून त्यांनी सुद्धा हा प्रयोग स्वतःवर करून पाहिला. तेव्हा त्यांनी देखील स्वतःच्या शरीराला काही नाणे लावून पाहिले तर ते चिटकले. त्यानंतर त्यांनी काही स्टीलच्या वस्तू देखील शरीराला लावून पाहिल्या, त्यादेखील चिटकल्या. शिवाय चाव्या पण चिटकत होत्या. हा प्रकार त्यांना स्वतःलाही गोंधळून टाकणारा ठरला.

परभणीत कुतूहल
दरम्यान, पाटेकर यांच्या या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ सध्या परभणीतील समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पाटेकर यांचे मित्र त्यांना फोन लावून किंवा प्रत्यक्ष भेटत आहेत. त्यांच्या या प्रकाराबाबत सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. नेमका हा काय प्रकार आहे, याबाबत तज्ज्ञ व्यक्तीच माहिती देऊ शकतील, परंतु सध्या तरी हा विषय परभणीत कुतूहलाचा ठरला आहे.

हेही वाचा -Magnet Man नाशिकच्या या व्यक्तीच्या शरीराला चिकटतात लोखंडी वस्तू, लस घेतल्यानंतर सुरू झाला प्रकार

हेही वाचा -यंदाही 'बा विठ्ठला'ची पायी वारी नाहीच! मानाच्या दहा पालख्याच बसने जाणार पंढरीला

ABOUT THE AUTHOR

...view details