महाराष्ट्र

maharashtra

मधमाशांच्या हल्ल्यात 16 जण जखमी; परभणीच्या पूर्णा तालुक्यातील घटना

By

Published : Sep 28, 2019, 10:07 PM IST

अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर झाडावरील मधमाशांनी हल्ला केला. यात 16 जण जखमी झाले आहेत.

संग्रहीत छायाचित्र

परभणी- अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर झाडावरील मधमाशांनी हल्ला केला. ज्यामध्ये 16 जण जखमी झाले. यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. जिल्ह्यातील पुर्णा तालुक्याच्या निळा गावात आज (शनिवार) दुपारी ही घटना घडली.

हेही वाचा - परभणीच्या सेलूत रोडरोमियोला तरुणीचा चोप, व्हिडिओ व्हायरल

गावातील लोचनाबाई सुर्यवंशी यांच्या अंत्यविधीस गावकरी व पाहुणे मंडळी पुर्णा नदीच्या तिरावर असलेल्या स्मशानभूमीत जमले होते. या परिसरात एका झाडावर मोठा मध माशांचा पोळा होता. अंत्यविधीची तयारी सुरु असताना काही लोकांना मधमाशीच्या पोळ्यापासून धोका असल्याची बाब निदर्शनास आली.

हेही वाचा - 'पदवीधर'साठी परभणीत मतदारांची नव्याने नोंदणी; 31 हजार मतदारांची यादी रद्द


त्यामुळे तात्काळ महिलांना तेथून दुसरीकडे पाठविण्यात आले. परंतु, महिला काही अंतरावर पोहोचताच, पोळ्यावरील माश उठून त्यातील विषारी माशांनी हल्ला केल्याने त्याठिकाणी धावपळ उडाली. गावकरी व पाहूणे माशांपासून बचाव करण्यासाठी मिळेल, त्या दिशेने धावू लागले. परंतु आक्रमक झालेल्या माशांनी पिच्छा सोडला नाही. यात 15 लोकांसह एका बालकावर हल्ला करत सोळा लोकांचा चावा घेऊन त्यांना जखमी केले. जखमींनी गावात तसेच पूर्णा येथे डॉक्टरांकडे जावून उपचार घेतले.

Intro:परभणी - अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर झाडावरील मधमाश्यांनी हल्ला केला. ज्यामध्ये 16 जण जखमी झाले आहेत. यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे.Body: परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्याच्या निळा गावात आज (शनिवार) दुपारी ही घटना घडली. गावातील लोचनाबाई सुर्यवंशी यांच्या अंत्यविधीस गावकरी व पाहुणे मंडळी पुर्णा नदी तिरावर असलेल्या स्मशान भुमीत जमले होते. या परिसरात एका झाडावर मोठा आग्या माश्यांचा मधाचा मोहोळ होता. अंत्यविधीची तयारी सुरु असतांना काही लोकांना मोहोळापासून धोका असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे तात्काळ महिलांना तेथून काढून देण्यात आले. परंतू महिला काही अंतरावर पोहोचताच, आग्या मोहोळाच्या माश्या उठून त्यातील विषारी माश्यांनी हल्ला केल्याने धावपळीस सुरुवात झाली. गावकरी व पाहूणे माश्यांपासून बचाव करण्यासाठी मिळेल, त्या दिशेने धावू लागले; परंतु आक्रमक झालेल्या माश्यांनी पिच्छा सोडला नाही. यात 15 लोकांसह एका बालकावर हल्ला करीत सोळा लोकांचा चावा घेऊन त्यांना जखमी केले. जखमींनी गावात तसेच पूर्णा येथे डॉक्टरांकडे जावून उपचार घेतले.

- गिरीराज भगत, परभणी
- कृपया file फोटो वापरावा, ही विनंती...Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details