महाराष्ट्र

maharashtra

पालघर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठीची रंगीत तालीम

By

Published : Jan 8, 2021, 6:33 PM IST

पालघर शहरातील माता बाल संगोपन केंद्र, मासवण येथील आश्रमशाळा, तसेच वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रातील एक अशा तीन ठिकाणी ही रंगीत तालीम घेण्यात आली.

training dry run  for corona preventive vaccination in palghar
पालघर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठीची रंगीत तालीम

पालघर -कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठीची रंगीत तालीम आज पालघर जिल्ह्यात पार पडली. पालघर शहरातील माता बाल संगोपन केंद्र, मासवण येथील आश्रमशाळा, तसेच वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रातील एक अशा तीन ठिकाणी ही रंगीत तालीम घेण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील आणि इतर अशा पंचवीस कर्मचाऱ्यांची निवड या कोरोना लसीकरण रंगीत तालीमेसाठी करण्यात आली होती.

जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

16 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार लस -

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 16 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये जनजागृती आणि सविस्तर माहिती मिळावी, यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांची यावेळी प्रमुख उपस्थित होती.

हेही वाचा - राज्यपाल नियुक्त आमदार होऊ न देणारे घटनेचे मारेकरी- संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details