महाराष्ट्र

maharashtra

Jawan Missing Tarapur Nuclear Power Station : तारापूर अणुऊर्जा केंद्रात तैनात असलेला जवान रायफल अन् काडतुसांसह बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू

By

Published : Sep 4, 2022, 11:45 AM IST

Etv Bharat
भाभा अणू ऊर्जा प्रकल्प ()

तिसंवेदनशील असलेल्या पालघर तालुक्यातील तारापूर ( Security Personnel Missing From Tarapur ) येथील भाभा अणू ऊर्जा प्रकल्पात बंदोबस्तासाठी तैनात असलेला सीआयएसएफचा जवान त्याच्यासोबत पिस्टल आणि तीस जिवंत काडतुसासह बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली ( Missing Case of Tarapur Nuclear Power Station ) आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची टीम तयार करण्यात आली आहे.

पालघर -तारापूर अणुऊर्जा केंद्रात तैनात असलेला 35 वर्षीय एव्हिएशन सीआयएसएफ गार्ड त्याच्या रायफल आणि 30 काडतुसांसह बेपत्ता (Tarapur aviation CISF guard Missing) झाला आहे. तारापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, एक टीम तयार केली असून जवानाचा शोध सुरू केला आहे, अशी माहिती तारापूर पोलिसांनी दिली आहे.

अतिसंवेदनशील असलेल्या पालघर तालुक्यातील तारापूर ( Security Personnel Missing From Tarapur ) येथील भाभा अणू ऊर्जा प्रकल्पात बंदोबस्तासाठी तैनात असलेला सीआयएसएफचा जवान त्याच्यासोबत पिस्टल आणि तीस जिवंत काडतुसासह बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली ( Missing Case of Tarapur Nuclear Power Station ) आहे. तो कुठे गेला, त्याने ही काडतुसे का घेतली, तो कोणाला भेटला आणि तो सध्या कुठे आहे या प्रश्नांनी सर्व सुरक्षा यंत्रणा चक्रावली असून, या जवानाचा युद्धपातळीवर तपास सुरू आहे. त्यामुळे या राष्ट्रीय प्रकल्पाच्या सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला Security Missing From Tarapur Power Station आहे.

तारापूर हा भारतातील सर्वात मोठा अणूऊर्जा प्रकल्प :पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे भारतातील सर्वात मोठा अणूऊर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प अतिसंवेदनशील असल्याने या ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत असलेला केंद्रीय औद्योगिक दलाचा जवान स्वतः जवळ असलेली पिस्टल आणि 30 जिवंत काडतुसांसह काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक गायब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

दोन महिन्यांपासून तो तारापूर येथील अणुशक्ती केंद्रात रुजू :मनोज यादव असे या गायब झालेल्या जवानाचे नाव असून, तो सन 2010 पासून सेवेत असून, दोन महिन्यांपासून तो तारापूर येथील अणुशक्ती केंद्रात रुजू झाला होता. मूळचा चंदौली उत्तर प्रदेशचा राहणारा असल्याचे समजते. तारापूर येथे असलेल्या सीआयएसएफ कॉलनीमध्ये एकटा राहणारा हा जवान काही तासानंतर पुन्हा कामावर रुजू होईल याच्या प्रतीक्षेत सीआयएसएफचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी होते. मात्र, सायंकाळपर्यंत त्याचा ठावठिकाणा न लागल्याने तारापूर येथील पोलीस ठाण्यात सीआयएसएफतर्फे माहिती देण्यात आली.

राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा प्रचंड टेन्शनमध्ये : ही घटना देशाच्या सुरक्षेसंदर्भात अतिशय गंभीर असल्याने याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत असून, जवानाला शोधण्यासाठी पोलिसांची टीम रवाना करून शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान, हा जवान पिस्टल व 30 जिवंत काडतुसे घेऊन गेल्याने तो या काडतुसांचे काय करणार आहे. त्याचे लक्ष काय आहे, याची शंका व्यक्त करण्यात येत असून, सुरक्षा यंत्रणा प्रचंड टेन्शनमध्ये आली आहे. हा जवान अणुशक्ती केंद्रातील सुरक्षेच्या गोष्टी आहे त्याचा रहस्य भेद तर करणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details