महाराष्ट्र

maharashtra

शेतकऱ्यांना पाकिस्तानी आणि खलिस्तानी संबोधल होतं, ते कसे विसरणार - राकेश टिकैत

By

Published : Nov 20, 2021, 10:43 AM IST

सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जोवर संसदेत याबाबत निर्णय होत नाही. तोवर आंदोलन मागे घेण्यात येणार नाही. त्याचबरोबरीने जोपर्यंत एम.एस.पी. वर निर्णय होत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही टिकैत यांनी यावेळी दिला.

राकेश टिकैत
Rakesh Tikait

मुंबई - शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी कृषी कायदे (Farm laws rolled back) परत घेत असल्याची मोठी घोषणा केली. यावर आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी म्हटलं. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले असून हे शेतकऱ्यांच यश असल्याचं मत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केले आहे. एम.एस.पी.वर निर्णय होत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहील, असे राकेश टिकैत म्हणाले. बिरसा मुंडा यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त पालघरमध्ये आज भूमी सेना, आदिवासी एकता परिषदेच्या पुढाकाराने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त पालघर रेल्वे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली होती. या उत्सवाला राकेश टिकैत पालघरमध्ये उपस्थित होते.

राकेश टिकैत यांचे संबोधन...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय -

सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जोवर संसदेत याबाबत निर्णय होत नाही. तोवर आंदोलन मागे घेण्यात येणार नाही. त्याचबरोबरीने जोपर्यंत एम.एस.पी. वर निर्णय होत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही टिकैत यांनी यावेळी दिला. मोदी सरकार खाजगीकरणावर जास्त भर देत असून सध्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचा उतरता क्रम पाहता मोदी सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचे यावेळी टिकैत म्हणाले. कायदे मागे घेण्याची घोषणा केली. मात्र, त्यावर चर्चा होऊन निर्णय होईल. जो पर्यंत समाधान होणार नाही. तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शेतकऱ्यांना पाकिस्तानी आणि खलिस्तानी म्हटलं हे कसं विसरून चालेल -

यापुढेही शेतकऱ्यांच्या हितासाठी व हक्कांसाठी देशात संयुक्त मोर्चा लढा देईल. दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी आणि खलिस्तान म्हटलं हे कसं विसरून चालेल, असे टिकैत म्हणाले. येत्या 28 तारखेला आम्ही मुंबईत येणार आहोत. तुम्ही आवाज दिला तर दिल्लीत जेवढे ट्रॅक्टर आहेत ते सर्व इथे येतील, असे देखील राकेश टिकैत यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details