महाराष्ट्र

maharashtra

पालघर जिल्हा वीज वितरण सक्षमीकरण आराखडा तातडीने मंजूर करू- ऊर्जामंत्री नितीन राऊत

By

Published : May 23, 2021, 8:16 AM IST

Updated : May 23, 2021, 9:42 AM IST

वादळामुळे वारंवार वीजपुरवठा बाधित होणाऱ्या भागात विजवाहिन्या येत्या काळात भूमिगत करण्याची शक्यताही आम्ही पडताळून पाहत आहोत. जिल्हा नियोजन समितीत हा आराखडा तयार करून आमच्या विभागाकडे पाठविल्यानंतर त्याची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यात येईल, असे राऊत म्हणाले

नितिन राऊत
नितिन राऊत

पालघर- जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी आराखडा तयार करावा व जिल्हा नियोजन समितीमार्फत पाठवावा, अशी मागणी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. पालघर जिल्हा आदिवासी बहुल व नवीन असल्याने हा आराखडा तातडीने मंजूर करून पालघर जिल्ह्याला अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कामे केली जातील असेही राऊत म्हणाले. पालघर जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणेच्या दुरुस्तीची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज पालघरचा दौरा करत महावितरण नुकसान व सुरू असलेल्या दुरुस्तीची पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीला हजेरी लावली.

ऊर्जामंत्री नितीन राऊत

जिल्ह्याचा वीज सक्षमीकरण आराखडा तयार करण्याच्या सूचना
पालघर हा नवीन जिल्हा असून आदिवासीबहूल जिल्हा आहे. या जिल्ह्याचा विद्युत आराखडा तयार करण्याची विनंती मी पालकमंत्री दादाजी भुसे यांना केली आहे. त्यांनी जिल्हा नियोजन समितीत हा आराखडा तयार करून आमच्या विभागाकडे पाठविल्यानंतर त्याची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यात येईल, असे राऊत म्हणाले. पालघर सर्कलचे विभाजन करण्याच्या मागणीवरही हा विद्युत आराखडा तयार करताना विचार केला जाण्याची विनंती नितीन राऊत यांनी केली आहे.

डहाणू येथील उपकेंद्र सुरू करण्याबाबत प्रयत्नशील
डहाणू येथील उपकेंद्राला वनविभागाची मान्यता मिळण्यात असलेला अडसर सध्या वनविभागाचा कार्यभार सांभाळणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून दूर करण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्तेच या उपकेंद्राचे उद्घाटन होईल याचा प्रयत्न करू असे राऊत यांनी जाहीर केले.

टास्क फोर्स व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा करणार स्थापन
वादळामुळे वारंवार वीजपुरवठा बाधित होणाऱ्या भागात विजवाहिन्या येत्या काळात भूमिगत करण्याची शक्यताही आम्ही पडताळून पाहत आहोत. अशा संकटाचा यशस्वी सामना करण्यासाठी टास्क फोर्स आणि कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

Last Updated : May 23, 2021, 9:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details