महाराष्ट्र

maharashtra

पालघर रेल्वे स्थानकात रेल्वेमध्ये कोविड सेंटर सुरू

By

Published : May 4, 2021, 10:54 PM IST

रेल्वेच्या या 23 डब्यांमध्ये जवळपास 415 कोरोना रुग्णांच्या उपचाराची क्षमता आहे. सध्या पहिल्या टप्प्यात रेल्वेच्या 5 डब्यांमध्ये कोरोना रुग्णांसाठी जवळपास 90 बेडची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक डब्यात 18 बेड असून यात 2 ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे.

रेल्वेमध्ये कोविड सेंटर सुरू
रेल्वेमध्ये कोविड सेंटर सुरू

पालघर -जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे पालघरकरांच्या मदतीसाठी पुढे सरसावली असून पालघर रेल्वे स्थानकावर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेल्वे ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था असलेले रेल्वे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या रेल्वे कोविड सेंटरचे लोकार्पण पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, खासदार राजेंद्र गावित, नगराध्यक्ष उज्ज्वला काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

रेल्वेमध्ये कोविड सेंटर सुरू

रेल्वेमध्ये कोविड सेंटर सुरू

पालघर रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या 24 डब्यांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचारासाठी कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यातील रेल्वेचे 23 डब्बे कोरोना रुग्णांसाठी तर एक डब्बा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. रेल्वेच्या या 23 डब्यांमध्ये जवळपास 415 कोरोना रुग्णांच्या उपचाराची क्षमता आहे. सध्या पहिल्या टप्प्यात रेल्वेच्या 5 डब्यांमध्ये कोरोना रुग्णांसाठी जवळपास 90 बेडची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक डब्यात 18 बेड असून यात 2 ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे.

वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर कोविड सेंटर

पालघर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा अनुषंगाने कोविड रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता जाणवत असून रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रवासी संघटना यांनी पश्चिम रेल्वेकडे पालघर रेल्वे स्थानकात रेल्वे डब्यांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पश्चिम रेल्वे पालघरकरांच्या मदतीसाठी पुढे सरसावली असून पालघर रेल्वे स्थानकात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेल्वे ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था असलेले रेल्वे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा -पुण्यात लसीचा तुटवडा; शहरात सलग चौथ्या दिवशी लसीकरण ठप्प

ABOUT THE AUTHOR

...view details