महाराष्ट्र

maharashtra

विरारमध्ये हॉटेल मालकाची गळफास घेऊन आत्महत्या

By

Published : Jul 15, 2021, 7:12 PM IST

Updated : Jul 15, 2021, 7:42 PM IST

करुणाकर पुत्रण यांच्या अंगावर दोन वर्षांपासून थकीत भाडे व लाईटच्या बिलाचे असे अंदाजे ४० लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांना या कर्जासाठी तगादा लावून हैराण केले जात होते. या तणावाला कंटाळून त्यांनी आपले जीवन संपविल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे.

स्टार हॉटेल
स्टार हॉटेल

विरार (पालघर) - विरारमध्ये स्टार प्लॅनेट हॉटेलच्या मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करूणाकर बी. पुत्रण असे हॉटेल चालक-मालकाचे नाव असून कोरोनामुळे आलेले आर्थिक संकट व कर्जाच्या होणाऱ्या तगाद्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आज (गुरूवार) सकाळच्या सुमारास हॉटेलमध्ये कोणी नसताना त्यांनी गळफास घेतला. याबाबतची माहिती अर्नाळा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठविला आहे.

हॉटेल मालकाची गळफास घेऊन आत्महत्या

कर्जाला कंटाळून आत्महत्या

करुणाकर पुत्रण यांच्या अंगावर दोन वर्षांपासून थकीत भाडे व लाईटच्या बिलाचे असे अंदाजे ४० लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांना या कर्जासाठी तगादा लावून हैराण केले जात होते. या तणावाला कंटाळून त्यांनी आपले जीवन संपविल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे. या घटनेने वसई विरारच्या हॉटेल व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हॉटेल चालकाच्या पत्नीने केली आहे.

हेही वाचा -नक्षलवाद्यांना विस्फोटक, हत्यार पुरवठा करणाऱ्या ८ आरोपींना अटक

Last Updated : Jul 15, 2021, 7:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details