महाराष्ट्र

maharashtra

अर्नाळा परिसरात रान डूकरांचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान

By

Published : May 4, 2021, 3:57 PM IST

गेल्या दोन महिन्यांपासून अर्नाळा परिसरातील शेतांमध्ये रान डूकरांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांचे पिक उद्धवस्त केल्याने, मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान मंगळवारी अर्नाळ्यातील समूद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांना पाच ते सहा डूकरांचा कळप हा समुद्रात पोहताना आढळून आला. दरम्यान अर्नाळा सारख्या पर्यटनस्थळी रान डूकरांचा वावर असल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अर्नाळा परिसरात रान डूकरांचा धुमाकूळ
अर्नाळा परिसरात रान डूकरांचा धुमाकूळ

विरार (पालघर)गेल्या दोन महिन्यांपासून अर्नाळा परिसरातील शेतांमध्ये रान डूकरांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांचे पिक उद्धवस्त केल्याने, मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान मंगळवारी अर्नाळ्यातील समूद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांना पाच ते सहा डूकरांचा कळप हा समुद्रात पोहताना आढळून आला. दरम्यान अर्नाळा सारख्या पर्यटनस्थळी रान डूकरांचा वावर असल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अर्नाळा परिसरात रान डूकरांचा धुमाकूळ

रान डूकरांच्या वावरामुळे दहशतीचे वातावरण

दरम्यान याबाबत मार्च महिन्यामध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांनी वनविभागाला कळवले होते. या रान डूकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र अद्यापही या परिसरामध्ये रान डूकरांचा वावर आहे. अर्नाळा हे निसर्गसंपन्न असल्यामुळे हजारो लोक पर्यटनासाठी अर्नाळ्याला येत असतात. तसेच या परिसरामध्ये बागायती शेती आहे. ही रान डूकरे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहेत.

हेही वाचा -सकारात्मक! राज्यातील 12 जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत घट

ABOUT THE AUTHOR

...view details