महाराष्ट्र

maharashtra

पालघरमध्ये वाळू उत्खननावर पोलिसांची धाड; ७ कोटीचा मुद्देमाल जप्त

By

Published : Sep 28, 2020, 8:22 AM IST

Updated : Sep 28, 2020, 2:36 PM IST

पालघर पोलीस अधीक्षकांच्या विशेष टीमने वाळू उत्खनावर कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 152 सक्शन पंप, 1650 ब्रास वाळू, 230 बोटी, 1 जेसीबी असा तब्बल 7 करोड 90 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

massive anti-sand mining raids
पालघरमध्ये वाळू उत्खननावर पोलिसांची धाड


पालघर- विरार शहरातील खानिवडे तसेच खर्डी येथील तानसा आणि वैतरणा नदीच्या पात्रात विनापरवाना रेती उत्खनन केले जात होते. या माहितीच्या आधारे पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने या वाळू उत्खननाच्या ठिकाणी सापळा रचून धाड टाकली. शनिवारी सायंकाळी सुरू केलेल्या या कारवाईत तब्बल 152 सक्शन पंप, 1650 ब्रास वाळू, 230 बोटी, 1 जेसीबी असा एकूण 7 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पालघर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

पालघरमध्ये वाळू उत्खननावर पोलिसांची धाड
पालघर जिल्ह्यातील खानिवडे, वैतरणा, नारिंगी, खर्डी या विभागातून अवैधरित्या उखन्नन व रेतीची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी होते. विरार परिसरात खानिवडे येथील नदीतून आणि खाडीतून रात्रीच्या वेळी वाळू उपसा केला जात होता. याबाबतची माहिती पालघर पोलीस अधीक्षक यांना मिळाली होती. यावर शिंदे यांनी या चोरट्या सुरू असलेल्या वाळू उत्खननावर कारवाई करण्यासाठी एक पथक सज्ज केले. त्यानंतर अधीक्षक शिंदे यांच्यासह या विशेष पथकाने दोन गट करून खानिवडे आणि खर्डी येथील वाळू उत्खननच्या ठिकाणावर धाडी टाकल्या.
पालघरमध्ये वाळू उत्खननावर पोलिसांची धाड

या धाडीत खर्डी येथून 74 लाख 9 हजारांची 750 ब्रास वाळू, 15 लाखांचा 1 जेसीबी, 1 कोटी 80 लाखांच्या 80 बोटी, 50 लाखांचे 50 सक्शन पंप असा एकूण 2 कोटी 99 लाख 9 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दुसऱ्या धाडीत खानिवडे बंदरातून 83 लाख 97 हजार 150 रुपयांची 850 ब्रास वाळू, 1 कोटी 2 लाखांचे 102 सक्शन पंप, 3 कोटी रुपयांच्या 150 बोटी आणि 4 लाख 93 हजार 950 रुपयांची क्रशर जवळील 50 ब्रास वाळू साठा असा एकूण 4 करोड 90 लाख 91 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दोन्ही कारवाई मिळून एकूण 152 सक्शन पंप, 1650 ब्रास वाळू, 230 बोटी, 1 जेसीबी असा 7 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वसई तालुक्यातील इतिहासात आजपर्यंतची ही पहिली मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

या कारवाईत आरोपी विरोधात विरार पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करून दोन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पुढील तपास देण्यात आला आहे. या कारवाईवेळी वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, विरार, नालासोपारा, पालघर येथील उपविभागीय अधिकारी आणि इतर अधिकारी व पोलीस कर्मचारी हजर होते.


Last Updated : Sep 28, 2020, 2:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details