महाराष्ट्र

maharashtra

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मंदिर संस्थानचा ड्रेस कोडवरून यु टर्न; भाविकांना कोणतेही निर्बंध नाहीत

By

Published : May 18, 2023, 10:21 PM IST

Updated : May 18, 2023, 10:36 PM IST

Tulja Bhavani Mandir
तुळजाभवानी मंदिरात ड्रेसकोडचा निर्णय

कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात वेस्टर्न कपड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय मंदिर संस्थानने गुरुवारी सकाळी घेतला होता. या निर्णयानंतर मंदिर प्रशासनाने आता यू-टर्न घेतला आहे. अशा पद्धतीचे कोणतेही निर्बंध भाविकांवर नसल्याचे मंदिर प्रशासनाने जाहीर केले आहे.

धाराशिव (उस्मानाबाद) : तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने 'अश्लील' कपडे घालून मंदिरात येण्यावर बंदी घातली होती, नंतर आता लगेच मंदिर प्रशासनाने यू-टर्न घेतला आहे. असभ्य कपड्यांविरोधातील आदेशानंतर लागू केलेल्या नियम काही तासांनंतर हटवला आहे. प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिराच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, भाविकांवर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. तुळजापूर हे शतकानुशतके जुने मंदिर दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करते. मंदिरात दर्शनासाठी किंवा पूजेसाठी येणाऱ्या भाविकांवर कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही, असे परिपत्रकात म्हटले आहे.

काय होता तो फलक -तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांनाच्यावतीने एक नियमावली जारी करण्यात आली होती. त्या नियमावलीचे फलक हे मंदिरात लावण्यात आले आहेत. बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेले अशा भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही असे म्हटले होते. ड्रेसकोडबाबतचे नियम आजच लागू करण्यात आले. या नियमांची पूर्वकल्पना भाविकांना देण्यात आली नाही. अचानकपणे लागू करण्यात आलेल्या नियमांचा फटका भाविकांना बसला.

काय होता नियम - मंदिराच्या परिसरात महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट प्ॅन्ट घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. फक्त महिलांना नाही तर पुरूषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाहीड आहे. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी विविध नियम लागू करण्यात आले होते. त्यानंतर मोठा गदारोळ झाला.

ही होती नियमावली : तुळजाभवानी मंदिर हे राज्यातील एक शक्तीपीठ मंदिर आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे हे मंदिर बालाघाटच्या एक कड्यावर वसले आहे. हे मंदिर राष्ट्रकुट म्हणजे यादवकालीन असल्याचे सांगितले जाते. या तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांच्या वतीने एक नियमावली जारी करण्यात आली आहे. बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट परिधान करुन मंदिरात प्रवेश करता येणार नाही. पुरुषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाही.

कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात असे फलक :कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात वेस्टर्न कपड्यांवर बंदी घातली होती. भारतीय संस्कृती व सभ्यतेचे भान राखण्याचे आवाहनही संस्थानने केले होते. तसा आशयाचा फलकदेखील तुळजाभवनी मंदिरात फलक लावण्यात आले होते. ऑक्टोबर 2018मध्ये नवरात्री दरम्यान कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरबाबत असाच निर्णय घेतला होता. तर शिर्डीमध्येही अशाप्रकारचे बोर्ड लावण्यात आले होते. पण लोकांच्या विरोधानंतर हे फलक काढण्यात आले होते.

हेही वाचा -

  1. Tulja Bhavani Temple अंगावर तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना तुळजापूर मंदिरात दर्शनास मनाई ड्रेस कोड लागू
  2. Ambabai Temple भक्तांकडून अंबाबाईच्या चरणी इतक्या लाखांचे दान
  3. Bhendoli Utsav श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भेंडोळी उत्सव उत्साहात संपन्न भाविक मोठया संख्येने उपस्थित
Last Updated :May 18, 2023, 10:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details