महाराष्ट्र

maharashtra

Osmanabad bandh turns violent : उस्मानाबाद बंदला हिंसक वळण, हायवेवर टायर जाळले

By

Published : Oct 29, 2022, 3:39 PM IST

शिवसेनेने पुकारलेल्या आजच्या उस्मानाबाद बंदला हिंसक वळण ( Osmanabad bandh turns violent ) लागले आहे. सोलापूर-धुळे मार्गावर टायर पेटवून देण्यात ( Tires Burnt on Solapur Dhule Highway ) आले. त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळावा म्हणून गेल्या सहा दिवसापासून आमदार कैलास पाटील आमरण उपोषण करत आहेत.

bandh turns violent
बंदला हिंसक वळण

उस्मानाबाद : शिवसेनेने पुकारलेल्या आजच्या उस्मानाबाद बंदला हिंसक वळण ( Osmanabad bandh turns violent ) लागले आहे. सोलापूर-धुळे मार्गावर टायर पेटवून देण्यात ( Tires Burnt on Solapur Dhule Highway ) आले. त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळावा म्हणून गेल्या सहा दिवसापासून आमदार कैलास पाटील आमरण उपोषण करत आहेत.


जिल्हाधिकारी कार्यालयास लावले टाळे : सहा दिवस झाले तरी सरकार प्रशासन लक्ष देत नाही म्हणून आंदोलन तीव्र करण्यात आलय, काल दिवसभर शिवसैनिकांनी रास्ता रोको, जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून बसने, जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे लावणे, जलबैठे आंदोलन,असे अनेक आंदोलन केली तरी योग्य तो प्रतिसाद शासनाकडून मिळत नसल्याने आज उस्मानाबाद बंदचे आवाहन करण्यात आले होते.

बंदला हिंसक वळण

शेतकऱ्याचे विम्याचे पैसे द्यावेत : बजाज अलाईन्स जनरल इन्शूरन्स ( Bajaj Alliance General Insurance Company ) कंपनीने तात्काळ शेतकऱ्याचे विम्याचे पैसे द्यावेत अन्यथा यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिक देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर समर्थनात आज उस्मानाबाद बंदचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details