महाराष्ट्र

maharashtra

मलकापूरच्या एकनाथ लोमटे महाराज यांना विनयभंग प्रकरणी अटक

By

Published : Sep 14, 2022, 6:36 PM IST

लोमटे महाराज यांना विनयभंग प्रकरणी अटक
लोमटे महाराज यांना विनयभंग प्रकरणी अटक ()

एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा 28 जुलै 2022 रोजी नोंद करण्यात आला होता. त्यांना कळंब पोलीसांनी 45 दिवसानंतर अटक केली आहे (Eknath Lomte Maharaj of Malkapur arrested). गुन्हा नोंद झाल्यापासून लोमटे महाराज हे फरार होते. लोमटे महाराजाविरोधात भोंदूगिरीचेही गुन्हे दाखल आहेत. लोमटे महाराजांनी ब्लॅकमेल केल्याचीही प्रकरणे आहेत (fraud cases against lomte Maharaj). व्हिडिओ काढून ठेवल्याचे सांगून बलात्कार केल्याची ही गंभीर प्रकरणे त्यांच्या विरोधात आहेत.

उस्मानाबाद -मलकापूर येथील स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा 28 जुलै 2022 रोजी नोंद करण्यात आला होता. त्यांना कळंब पोलीसांनी 45 दिवसानंतर अटक केली आहे (Eknath Lomte Maharaj of Malkapur arrested). गुन्हा नोंद झाल्यापासून लोमटे महाराज हे फरार होते.

पीडित महिला मलकापूर येथील मठात दर्शनासाठी गेली असता महाराजांनी विनयभंग केल्याचा महिलेचा आरोप आहे. पिडीत महिलेच्या तक्रारीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराजाविरुद्ध याअगोदरही अनेक फसवणूकीच्या व भोंदूगिरीच्या तक्रारी आहेत. कळंब तालुक्यातील मलकापूर येथे लोमटे महाराजांचा मठ आहे. त्यांना विनयभंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे

लोमटे महाराज फक्त जिल्ह्यातच प्रसिद्ध नाही तर महाराजांचे राज्यभर मोठ्या प्रमाणात भक्त आहेत. विशेष म्हणजे राज्यात वेगवेगळ्या पक्षांचे बडे नेतेही लोमटे महाराजांचे भक्त आहेत. मात्र याता लोमटे महाराजांना अटक झाली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रच नाही तर धार्मिक क्षेत्रातही खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच इतरही काही तक्रारी असतील तर त्याचाही तपास केला जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराजांनी किती महिलांची फसवणूक केली हे तपासात उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले.

विनयभंगाचे हे नेमके प्रकरण काय - लोमटे महाराजांचे दर्शन घेण्यासाठी एक महिला आली होती. त्यावेळी त्यांनी या महिलेचा विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे प्रकरण खूप पूर्वी घडले आहे. दीड महिन्यापूर्वीच यासंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर महाराज फरार झाले होते. या लोमटे महाराजाविरोधात भोंदूगिरीचेही गुन्हे दाखल आहेत. लोमटे महाराजांनी ब्लॅकमेल केल्याचीही प्रकरणे आहेत. व्हिडिओ काढून ठेवल्याचे सांगून बलात्कार केल्याची ही गंभीर प्रकरणे त्यांच्या विरोधात आहेत (fraud cases against lomte Maharaj). यातील एका प्रकरणानुसार गुन्हा दाखल झाल्यावर लोमटे महाराज फरार झाला होता. आता त्यांना अटक झाल्याने सगळ्याच प्रकरणाचा तपास होणे अपेक्षित आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details