महाराष्ट्र

maharashtra

Hyderabad Liberation War हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्य लढ्यातील हवालदार बचित्तर सिंह यांची शौर्यगाथा

By

Published : Aug 15, 2022, 5:01 PM IST

Havaldar Bachittar Singh
हवालदार बचित्तर सिंह ()

दिल्लीच्या लाल किल्ल्यावर Red Fort of Delhi तिरंगा ध्वज डौलाने फडकत होता परंतु इकडे मराठवाडा Under the Marathwada Nizam निजामाच्या अंमलाखाली होता मराठवाडा मुक्ती संग्रामाचे Marathwada Liberation War अभूतपूर्व पर्व सुरू झालंस्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात बलिदानाची आहुती देणारे भारतीय सैन्य दलातील हवालदार बचित्तर सिंह Havaldar Bachittar Singh यांच्या शौर्याचे, आणि बलिदानाचे पोवाडे उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग परिसरात आजही ऐकायला मिळतात.

उस्मानाबाद15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य India got independence on 15 August 1947 मिळालं देशात स्वातंत्र्याचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात होता, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर Red Fort of Delhi तिरंगा ध्वज डौलाने फडकत होता परंतु इकडे मराठवाडा Under the Marathwada Nizam निजामाच्या अंमलाखाली होता, त्यामध्ये उस्मानाबाद जिल्हाही निजामाच्या अंमलाखाली होता. इथल्या तरुणांनाही स्वातंत्र्याची आस होती, स्वातंत्र्याची पहाट इथल्या जनतेला खुणावत होती अनेक पराक्रमी वीर या स्वातंत्र्यलढ्यात उतरले,उस्मानाबादेत Osmanabad स्वातंत्र्याची ठिणगी पडली,आणी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे Marathwada Liberation War अभूतपूर्व पर्व सुरू झालं याचं पर्वाने याच ठिणगीने धगधगत्या अग्निकुंडांचं रूप धारण केलं, या स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात बलिदानाची आहुती देणारे भारतीय सैन्य दलातील हवालदार बचित्तर सिंह Havaldar Bachittar Singh यांच्या शौर्याचे, आणि बलिदानाचे पोवाडे उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग परिसरात आजही ऐकायला मिळतात.


हेही वाचाAmbani family अँटिलिया प्रकरणानंतर पुन्हा अंबानी कुटुंबीयांना फोनवरून धमकी मुंबई पोलिसांचा तपास सुरू

पहिले शांतता काळातील अशोक चक्र प्रदान13 सप्टेंबर 1947 या दिवशी बचित्तरसिंह या युवकाने पराक्रमाची शर्थ केली पायाला गोळी लागली असतानाही समोरासमोर निडरपणे शत्रूला नेस्तनाबूत केले हैद्रराबादकडे जाणारा नळदुर्ग परिसरातील पूल रझाकार उध्वस्त करणार होते तो पूल रझाकरांनी उध्वस्त केला असता तर भारतीय सैन्याला आगेकूच करताना अडचण निर्माण झाली असती बचित्तरसिंह यांच्यामुळे हा पूल सुरक्षित राहिला आणि भारतीय सैन्याची आगे कुच सुरू झाली देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातून प्रेरणा घेतलेल्या हैद्राबाद मुक्ती संग्रामातील हुतात्मा हवालदार बचित्तरसिंह यांना देशातील पहिले शांतता काळातील अशोक चक्र प्रदान करण्यात आले त्यांच्या या पवित्र स्मृतींना उजाळा देत असताना हुतात्मा बचित्तरसिंह यांचे नळदुर्ग परिसरात स्मारक व्हावे अशी मागणी या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त करण्यात येत आहे.

हेही वाचाOperation Meghdoot सियाचीनमध्ये जवानाचे आढळले ३८ वर्षानंतर पार्थिव मेघदुत ऑपरेशनमध्ये बजाविली होती कामगिरी

ABOUT THE AUTHOR

...view details