महाराष्ट्र

maharashtra

केंद्रात चोरांचे सरकार, प्रकाश आंबेडकरांची भाजपवर घणाघाती टीका

By

Published : Apr 25, 2019, 6:26 PM IST

केंद्रात चोर-डाकूचे सरकार आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर केली.

प्रकाश आंबेडकर

नाशिक - केंद्रात चोर-डाकूचे सरकार असून नोटाबंदी करून त्यांनी सर्वाधिक काळ्या पैशांवर डल्ला मारला आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि पंतप्रधानांवर केला आहे. ते आज मनमाडमध्ये बापू गावडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर

भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. आरएसएस ही दहशतवादी संघटना आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान गुजरातचे आहेत त्यांना खूष करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला दिले. महाराष्ट्राचा माणूस उपाशी मेला तरी चालेल पण पंतप्रधानांची मर्जी राखली पाहिजे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांना लगावला.

नोटांवर गव्हर्नरची सही असते. तो नोटांचा मालक असतो आणि नोटा बंदीचा निर्णय पंतप्रधान घेतो. जो माणूस नोटांचा मालक नाही, तो त्या बंद करण्याचा निर्णय कसा घेऊ शकतो, असा सवाल उपस्थित करत त्यांनी नोटबंदीचा निर्णय फसला असल्याचे म्हटले आहे.

Intro:केंद्रात चोर डाकूचे सरकार असून नोटबंदी करून त्यांनी सर्वात जास्त काळ्या पैशावर डल्ला मारल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड.प्रकाश आंबेडकर यांनी केला


Body:भाजप काँग्रेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे त्यांनी मनमाड येथे सांगितले ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बापू गावडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते आर एस एस ही दहशतवादी संघटना आहे अशी टीकाही आंबेडकर यांनी यावेळी केली पंतप्रधान गुजरातचे आहेत त्यांना खूष करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला दिले महाराष्ट्राचा माणूस उपाशी मेला तरी चालेल पण पंतप्रधानांची मर्जी राखली पाहिजे अशा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना प्रकाश आंबेडकरांनी लगावला


Conclusion:नोटांवर गव्हर्नरची सही असते तो नोटांचा मालक असतो आणि नोटा बंदीचा निर्णय पंतप्रधान घेतो जो माणूस नोटांचा मालक नाही तो त्या बंद करण्याचा निर्णय कसा घेऊ शकतो असा सवाल यावेळी आंबेडकरांनी सत्याधारी पक्षाला विचारला नोटबंदीचा निर्णय बसला असून हा सरकारने पैशावर मारलेला डल्ला आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी मनमाडच्या जाहीर सभेत केला

ABOUT THE AUTHOR

...view details