महाराष्ट्र

maharashtra

दिवाळीची खरेदी करून परतताना भीषण अपघातात तीन मुलींसह चार जण ठार

By

Published : Nov 9, 2021, 1:46 AM IST

Updated : Nov 9, 2021, 1:57 AM IST

नाशिक जिल्ह्यात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. यात तीन मुलीसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना जिल्ह्यीतील घोटी रस्त्यावर घडली आहे. या घटनेने इगतपुरी तालुक्यात मुंढेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

truck-two-wheeler Horrific accident, four people including 3 girls were crushed by the truck in nashik
ट्रक-दुचाकी भीषण अपघातात तीन मुलींसह चार जण ठार

नाशिक - जिल्ह्यातील घोटी रस्त्यावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातात दुचाकीवर तीन मुलींसह चार जणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

दिवाळीची खरेदी करून परतताना भीषण अपघातात तीन मुलींसह चार जण ठार

चौघांचाही जागीच मृत्यू -

इगतपुरी येथील मुंढेगाव येथे राहणारा युवक तुषार कडू (24) हा आपल्या कुटुंबातील तीन मुलींना घेऊन दिवाळीची खरेदी करण्यासाठी घोटी येथे गेला होता. खरेदी करून पुन्हा गावाकडे येत असताना घोटी जवळ त्याच्या दुचाकीला ट्रकने कट मारल्याने यात दुचाकी चालक तुषार हटी कडू (24) पायल ज्ञानेश्वर गतीर (11) विशाखा ज्ञानेश्वर गतीर (8) ईश्वरी हिरामण डावखर (10) हे चौघेही खाली पडले. त्यातच त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने चौघे चिरडले गेले. यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंढेगाव परिसर आणि इगतपुरी तालुक्यात शोककळा पसरली असून घोटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग दुर्घटना : सहा जणांवर कारवाई - आरोग्यमंत्र्यांची ट्विट करत माहिती

Last Updated : Nov 9, 2021, 1:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details