महाराष्ट्र

maharashtra

नाशिक जिल्ह्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू

By

Published : Apr 17, 2019, 2:34 AM IST

जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील हौसाबाई फकीरा कुंवर (वय ७२) संपत शंकर उदार (वय ६५ रा. दिंडोरी) पिटु बापु शिंदे (वय ३० रा.जायखेडा) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक - जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ३ दिवसात ९ जणांचा मृत्यू झाला असून आज अवकाळी पावसामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील हौसाबाई फकीरा कुंवर (वय ७२) संपत शंकर उदार (वय ६५ रा. दिंडोरी) पिटु बापु शिंदे (वय ३० रा.जायखेडा) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.

देवळा तालुक्यातील वाजगाव येथे दुपारी पावसाच्या सरी कोसळत असताना बकरी बांधायला गेलेल्या हौसाबाईंवर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान यावेळी हौसाबाईंसह एक बकरी देखील मरण पावली आहे.
दरम्यान दिंडोरी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पहायला मिळाले. आज दुपारी खेडगाव जोपुळ आदी भागात वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले होते. याचवेळी अक्राळे येथील टेकडीवर असणाऱ्या मंदिरावर वीज पडली. यावेळी मंदिरातील पुजाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. संपत शंकर उदार(वय ६५) असे या मृत पुजाऱ्याचे नाव आहे.

जायखेडा येथील पाडगण शिवारात आज सायंकाळी वीज कोसळून मेंढपाळ जागीच ठार झाला. या तरुणाचे नाव पिंटू बापू शिंदे (वय ३०) असे आहे. हा तरुण साक्री तालुक्यात आयने येथील रहिवासी असल्याचे समजते. दुष्काळामुळे गावाकडे मेंढ्यांसाठी चारा पाणी उपलब्ध नसल्यामुळे ते जायखेडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून मेंढ्या चारीत होता. आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाल्याने पिंटूने जवळच असलेल्या लिंबाच्या झाडावर आसरा घेतला. यावेळी अचानक वीज कोसळली यात त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Intro:नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तीन दिवसात नऊ जणांचा मृत्यू झाला असुन आज अवकाळी पावसामुळे तीघाचा मृत्यू झाला नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील हौसाबाई फकीरा कुंवर वय 72 संपत शंकर उदार वय 65 रा. दिंडोरी पिटु बापु शिंदे वय 30 रा.जायखेडा याचा वीज कोसळून मृत्यू झाला


Body:देवळा तालुक्यातील वाजगाव येथे अवकाळी पावसात वीज पडून हौसाबाई फकीरा कुवर यांचा मृत्यू झाला आज दुपारी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडा सह पावसाच्या सरी कोसळत असताना त्या बकरी बांधण्यात जात असताना त्यांच्यावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान यावेळी हौशाबाई सह एक बकरी देखील मरण पावली आहे
याच दरम्यान दिंडोरी तालुक्यातील अवकाळी पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशी जोरदार हजेरी लावली असून आज दुपारी खेडगाव जोपुळ आदी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचे थैमान घातले होते याच वेळी अक्राळे येथील टेकडीवर असणाऱ्या मंदिरा वर वीज पडून मंदिरातील पुजाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला संपत शंकर उदार वय 65 असे या मृत पुजाऱ्याचे नाव आहे


Conclusion:जायखेडा येथील पाडगण शिवारात आज सायंकाळी वीज कोसळून मेंढपाळ जागीच ठार झाला असून तरुणाचे नाव पिंटू बापू शिंदे 30 असून साक्री तालुक्यात आयने येथील रहिवासी असल्याचे समजते दुष्काळामुळे गावाकडे मेंढ्यांसाठी चारा पाणी उपलब्ध नसल्यामुळे जायखेडा परिसरात गेल्या काही दिवसापासून तो मेंढ्या चारीत होता आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाल्याने पिंटू जवळच असलेल्या लिंबाच्या झाडावर आसरा घेतला यावेळी अचानक वीज कोसळली यात त्याचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले त्याचे नातेवाईक व अन्य मेंढपाळांनी त्या घाबरलेल्या अवस्थेत लागलीच त्याच्या मूळ गावी घेऊन गेल्याने अधिक माहिती समजू शकली नाही

ABOUT THE AUTHOR

...view details