महाराष्ट्र

maharashtra

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील देशातील सर्वात रूंद बोगद्याचे काम विक्रमी वेळात पूर्ण

By

Published : Sep 23, 2021, 11:19 AM IST

देशातील सर्वात रूंद बोगद्याचे काम विक्रमी वेळात पूर्ण

नागपूर-मुंबई 720 किलोमीटरच्या समृध्दी महामार्गाच्या कामातील सर्वात अवघड टप्पा हो होता. नाशिक जिल्ह्यातील पॅकेज क्रमांक 14 या पॅकेजतंर्गत देशातील सर्वात रूंद आणि कसारा घाट भेदून कठीण खडकातून तयार करण्यात आलेल्या बोगद्याचे काम एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे.

नाशिक - नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावरील इगतपुरी तालुक्यातील नांदगावसदो ते शहापुर तालुक्यातील वाशाळा पर्यंतच्या 8 किलोमीटर इतक्या लांब 17.5 मीटर रुंदीचे असे दुहेरी बोगद्याचे काम पुर्ण झाले आहे. हा भारतातील सर्वात रुंद आणि चौथ्या क्रमांकाचा दुहेरी बोगद्या आहे. या महामार्गावर मुंबईला जाण्यासाठी व मुंबईहुन येण्यासाठी स्वतंत्र 8 किलोमीटरचे दोन बोगदे तयार झाले आहेत. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावरील कसारा घाट भेदुन इगतपुरी जवळ हे बोगदे तयार करण्यात आले.

देशातील सर्वात रूंद बोगद्याचे काम विक्रमी वेळात पूर्ण

अवघ्या पाच मिनिटात पार होणार अंतर -

नागपूर-मुंबई 720 किलोमीटरच्या समृध्दी महामार्गाच्या कामातील सर्वात अवघड टप्पा हो होता. नाशिक जिल्ह्यातील पॅकेज क्रमांक 14 या पॅकेजतंर्गत देशातील सर्वात रूंद आणि कसारा घाट भेदून कठीण खडकातून तयार करण्यात आलेल्या बोगद्याचे काम एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. यामुळे इगतपुरी ते वशाळा (ठाणे) हे अंतर अवघ्या 5 मिनिटांत पार करता येणार आहे. तसेच, कसारा घाटातील वाहतूक कोंडीपासूनही सुटका होणार आहे. देशातील सर्वात लांब रूंदीचा चौथ्या क्रमांकाचा हा बोगदा आहे.

विक्रमी वेळेत काम पूर्ण
एफकॉन इंफ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट व्यवस्थापक शेखर दास यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता शक्ती उपाध्याय, राजीव सिंह, एम. एन. राव, परीतकर, पारीख सर व त्यांच्या 1500 कामगार व 150 अभियंते अशा बाहुबली टीमने हे शिवधनुष्य पेलले. या बोगद्याने आणखी एक विक्रम नोंदवला तो म्हणजे 8 कीलोमीटरचा हा दुहेरी बोगदा फक्त 2 वर्षात पुर्ण झाला. अभियांत्रिकीच्या इतिहासात भारतात तरी अशी नोंद नाही अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

बोगद्यासाठी 2 हजार 745 कोटी खर्च -

55 हजार कोटी रूपयांचा मुंबई-नागपुर समृध्दी महामार्ग 720 किलोमीटरचा असून इगतपुरीतील दुहेरी बोगदा हा या महामार्गाचा महत्वाचा टप्पा आहे. 2745 कोटी रूपये खर्च करून हा बोगदा खोदण्यासाठी ऑस्ट्रेलियन तंत्राचा वापर करण्यात आला होता. कसारा घाट पार करण्यासाठी वाहतुक कोंडी नसेल तर आजच्या घडीला 30 ते 35 मिनिटे लागतात. मात्र या बोगद्यातून कसारा घाट पार करण्यासाठी केवळ 5 मिनिटे लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details