महाराष्ट्र

maharashtra

Sanjay Raut News : शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरुन संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल

By

Published : Feb 20, 2023, 6:54 AM IST

Updated : Feb 22, 2023, 7:15 PM IST

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना चाटूगिरी हा शब्द वापरत बदनामी केली म्हणून शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात कलम 500 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

Sanjay Raut News
संजय राऊत

नाशिक :केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्रात वाद सुरू झाला आहे. यात शनिवारी दुपारी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बाहेर येऊन कार्यकर्त्यांची संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर शिंदे गट आणि भाजप नेत्यांकडून टीका करण्यात आली. यावर बोलताना राऊत म्हणाले की, 'टोकाची चाटूगिरी सूरू असून ते आम्हाला ज्ञान देत आहेत. अमित शाह यांना जर हे माहिती नसेल, तर शाहांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. हिडेनबर्ग रिपोर्ट, किम जॉर्ज रिपोर्ट आला आहे. ईव्हीएम 2014 पासुन हॅक करण्यात आले आहे. एका इस्त्राईल कंपनीला यांनी काँट्रॅक्ट दिले आहे. यांनी हिडेनबर्ग वरील देखील उत्तर दिले नाही.

सत्ताधारी पक्षावर गंभीर :शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हकेंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिवसैनिक तसेच संजय राऊत निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालावर आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे सर्वच नेते सध्या आक्रमक झाले आहेत. ते केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणा यांच्यावर सडकून टीका करत आहेत. खासदार संजय राऊत यांनी रविवारी केंद्रीय निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले. मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवजयंतीसह विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.

बिल्डर मित्रांकडून पैशांची मदत :उपस्थित पत्रकारांनी निवडणूक आयोगावर प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, 'माझ्याकडे पक्की माहिती आहे. नगरसेवक विकत घेण्यासाठी 50 लाख देण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर आमदार खरेदीसाठी 50 कोटी तर खासदारांच्या खरेदीसाठी 100 कोटी रूपये देत आहेत. तसेच त्यांनी निवडणुक आयोगाकडून नाव तसेच शिवसेना चिन्ह विकत घेतले आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. हा निकाल विकत घेण्यात आलेला आहे, कायद्यानुरूप न्याय देण्यात आलेला नाही. अशी मला खात्रीशीर माहिती आहे. हा निकाल विकत घेण्यासाठी या 2 हजार कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचे देखील राऊत म्हणाले. आता हे मुंबई महाराष्ट्र देखील विकत घेतील, अशी टीका देखील राऊतांनी केली.

काय म्हणाले फडणवीस : गृहमंत्री फडणवीस म्हणाले, संजय राऊत यांना फक्त सनसनाटी निर्माण करायची आहे. सुरक्षेचा विषय राजकारणाशी जोडणे अतिशय चुकीचे असून, पुराव्याशिवाय आरोप करणे त्यापेक्षाही चुकीचे आहे. हे आरोप सुरक्षेसाठी आहेत की सनसनाटी निर्माण करण्यासाठी याचीही चौकशी करू, असे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राऊत यांना धमकी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मागील वर्षी डिसेंबर महिन्यात तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी पुन्हा विरोधकांवर हल्ला चढवला होता. सरकारवर ते सत्तात्याने हल्लाबोल करीत होते. दरम्यान, संजय राऊत यांना दोन वेळा निनावी फोन आले होते. त्यांना फोन करणाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली होती. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून राजकारण पेटले असताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर यावरुन टीका केली होती. सरकार नामर्द असल्याची टीका राऊत यांनी केली होती. दरम्यान, शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर पलटवार करीत जोरदार हल्ला चढवला होता. राऊतांनी आपल्या जिभेवर ताबा ठेवावा असे शंभुराजे देसाई यांनी म्हटले होते. दरम्यान, ही पत्रकार परिषद झाल्यावर संजय राऊत यांना दोन वेळा धमकीचे फोन आले. दरम्यान, हे धमकीचे फोन कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून आल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

हेही वाचा : World Day Of Social Justice : 'जागतिक सामाजिक न्याय दिन' का साजरा केला जातो?, काय आहे पार्श्वभूमी, जाणून घ्या सविस्तर

Last Updated : Feb 22, 2023, 7:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details