महाराष्ट्र

maharashtra

शिधापत्रिका लाभार्थी अजूनही 'आनंदाचा शिधा' किटच्या प्रतिक्षेत

By

Published : Oct 20, 2022, 5:53 PM IST

Ration Card: दसऱ्याच्या मुहूर्तावर शिंदे फडणवीस सरकारने Shinde Fadnavis Govt शंभर रुपयात आनंदाचा शिधा या संकल्पनेची घोषणा Announcing concept of happiness ration केली आहे. सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने शंभर रुपयात एक किलो रवा, मैदा चणाडाळ आणि एक किलो तेल देण्याची योजना शिंदे फडणवीस सरकारने सुरू केली.

Ration Card
Ration Card

नाशिक: दसऱ्याच्या मुहूर्तावर शिंदे फडणवीस सरकारने Shinde Fadnavis Govt शंभर रुपयात आनंदाचा शिधा या संकल्पनेची घोषणा Announcing concept of happiness ration केली आहे. सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने शंभर रुपयात एक किलो रवा, मैदा चणाडाळ आणि एक किलो तेल देण्याची योजना शिंदे फडणवीस सरकारने सुरू केली. मात्र दिवाळी अवघ्या 6 दिवसांवर येऊन ठेपली असली, तरी नाशिक जिल्ह्यातील पिवळे आणि केशरी शिधा पत्रिका धारक या किट पासून वंचित आहे. नाशिक जिल्ह्यात पिवळे आणि केशरी शिधापत्रक मिळून तब्बल 7 लाख 93 हजार लाभार्थी आहेत.

जिल्ह्यातील शिधापत्रिका लाभार्थी अजूनही 'आनंदाचा शिधा' किटच्या प्रतीक्षेत

दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपल्याने आनंद शिधा किटची मागणी आता शिधा पत्रिका धारक राशन दुकानदारांकडे करू लागले आहेत. मात्र जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून तिकीट उपलब्ध नसल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागत आहे.

काय आहे आनंदाचा शिधा किटमध्येया दिवाळीत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब अर्थात केशरी शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांमध्ये दिवाळीचा शिधा मिळणार आहे. यामध्ये एक किलो चणाडाळ, एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो पामतेल या 4 वस्तू मिळणार आहेत.

कार्ड धारकांमध्ये उत्सुकतानाशिकमध्ये अजूनही या दिवाळी पॅकेजची प्रतीक्षाच आहे. रेशन दुकानदारांमधून प्रथमच अशा प्रकारचे पॅकेज मिळणार असल्याने हे पॅकेज नेमके कसे असेल, अशी उत्सुकता कार्डधारकांना आहे. याशिवाय पॅकेज मध्ये मिळणाऱ्या वस्तूंच्या दर्जा आणि ब्रँड याकडेही कार्डधारकांचे लक्ष लागून आहे. रेशन दुकानदाराकडे याच कुतुहालाने विचारणा होऊ लागले आहे.

लवकरच किट येईलकाही दिवसांपूर्वी पुरवठा अधिकाऱ्यांनी नाशिक शहरातील सर्वच रेशन दुकानदारांची मीटिंग घेऊन आम्हाला सरकारची योजना असलेल्या आनंदाचा शिधा कीट बाबत माहिती दिली. मात्र अद्याप हे किट आमच्या पर्यंत पोहचे नाही, आशा आहे की लवकरच हे कीट आमच्यापर्यंत येऊन आम्ही कार्ड धारकांना याचे वितरित करू शकू.

ABOUT THE AUTHOR

...view details