महाराष्ट्र

maharashtra

येवल्यात योग्य दरासाठी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन

By

Published : Jun 5, 2022, 7:39 PM IST

कांदा उत्पादन खर्च आणि बाजारभाव यातील तफावत अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मिळावे, नाफेडच्या खरेदी आणि शेतकऱ्याला मिळालेला भाव याची चौकशी व्हावी, शेतकऱ्याचे प्रलंबित अनुदान त्वरित अदा करावेत, पिक विमा पंचनामा नुसार आदा करावेत,खते आणि बी-बियाणे यांच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर जाहीर व्हावा व तक्रार 24 तासात निकाली काढावी, शासनाने रासायनिक खते शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून द्यावी तसेच कांद्याच्या भावात सुधारणा करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

agitation with onion garland around the neck for a fair price at yeola in nashik
येवल्यात योग्य दरासाठी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन

येवला ( नाशिक ) -येवला प्रहार संघटनेच्या वतीने कांदा भावा संदर्भात गळ्यात कांद्याच्या माळा घालून येवला तहसील व प्रांत कार्यालयावर घोषणाबाजी देत आंदोलन करण्यात आले. यावेळी कांद्याला सध्या 1 ते 7 रुपये किलो भाव मिळत आहे. मात्र, शेतकऱ्याला कांदा उत्पादनासाठी 18 ते 20 रुपये खर्च येत असल्याने यात केंद्र व राज्य सरकारने लक्ष घालून कांदा भावात सुधारणा करावी, अशी मागणी करत प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने तहसील , प्रांत कार्यालयावर गळ्यात कांद्याच्या माळा घालत घालून येत आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले.

मागण्या -कांदा उत्पादन खर्च आणि बाजारभाव यातील तफावत अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मिळावे, नाफेडच्या खरेदी आणि शेतकऱ्याला मिळालेला भाव याची चौकशी व्हावी, शेतकऱ्याचे प्रलंबित अनुदान त्वरित अदा करावेत, पिक विमा पंचनामा नुसार आदा करावेत,खते आणि बी-बियाणे यांच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर जाहीर व्हावा व तक्रार 24 तासात निकाली काढावी, शासनाने रासायनिक खते शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून द्यावी तसेच कांद्याच्या भावात सुधारणा करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details