महाराष्ट्र

maharashtra

Nashik City Police 31 डिसेंबरला अनुचित प्रकार टाळण्यासाठी तगडा बंदोबस्त: नाशिक शहरात 16 जागी नाकाबंदी, 2500 पोलीस रस्त्यावर

By

Published : Dec 31, 2022, 12:49 PM IST

राज्यभर 31 डिसेंबरच्या ( 31st Dec Celebration ) जल्लोषाचा चांगलाच फिव्हर रंगात आहे. नाशिक शहरातही 31 डिसेंबरच्या जल्लोषाची ( Nashik Police Security ) तयारी नागरिक करत आहेत. त्यामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ( Nashik City Police Set Up Security ) लावला आहे. शहरात 16 ठीकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तर 2500 पोलीस पहारा देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

Nashik City Police
नाशिक शहरात नाकाबंदी

नाशिक - शहरात थर्टी फर्स्टचा ( 31st Dec Celebration ) चांगलाच फिव्हर दिसून येत आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा ( Nashik City Police ) सज्ज झाली असून नाशिक शहरातील ( Nashik Police Security ) प्रमुख 16 मार्गांवर नाकाबंदी लावण्यात आली आहे. यावेळी ड्रंक अँड ड्राईव्हसह कर्णकर्कश सायलेन्सर तसेच भरधाव वेगात वाहने चालवणाऱ्यांवर ( Nashik City Police Set Up Security ) कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासह कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात 2500 पोलीस रस्त्यावर उतरले आहेत.

परवानगी न घेता पार्टी केल्यास कारवाईनववर्षाचे स्वागत करताना पार्टीचे आयोजन करण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. छुप्या पद्धतीने पार्टी केल्यास आयोजकांसह सहभागींवर पोलिसांनी कारवाईचे संकेत दिले आहेत. नाकाबंदीमध्ये रॅश ड्रायव्हिंग, सायलेन्सर वापर, अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मद्यपान ( Nashik Police Security ) करून वाहन चालवताना आढळलेल्या मद्यपींची तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.

या ठिकाणी असेल नाकाबंदीनाशिक शहरातील ( Nashik City Police ) अंबड टी पॉइंट, जिहान सर्कल, एबीपीसर्कल, गंगापूररोड, कॉलेजरोड, गंगापूर गाव, पपया नर्सरी, तिडके कॉलनी, सारडा सर्कल, मुंबई नाका मिरची हॉटेल, वेदमंदिर, जत्रा हॉटेल, नांदूर नाका, मेडिकल कॉलेज फाटा, दिंडोरी नाका, म्हसरूळ, पेठ नाका, राहू हॉटेल, दिंडोरी जकात नाका, आरटीओ कॉर्नर ( Nashik City Police Set Up Security ) मखमलाबाद नाका या ठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार आहे.

असा असेल पोलीस बंदोबस्तउपायुक्त 4, सहाय्यक ( Nashik Police Security ) आयुक्त 7, पोलीस निरीक्षक 56, सहाय्यक निरीक्षक 69, उपनिरीक्षक 76, सहाय्यक उपनिरीक्षक 240, कर्मचारी 2000, होमगार्ड 250, आरपीएफ जवान 150.

ABOUT THE AUTHOR

...view details