महाराष्ट्र

maharashtra

धक्कादायक! तिसरी देखील मुलगीच झाल्यामुळे आईनेच केली १० दिवसाच्या मुलीची गळा दाबून हत्या

By

Published : Jun 3, 2019, 9:49 AM IST

Updated : Jun 3, 2019, 11:26 AM IST

नाशिकच्या आडगाव परिसरातील ही घटना आहे. अनुजा काळे असे या आईचे नाव आहे.

नाशिकच्या आडगाव परिसरातील ही घटना आहे. अनुजा काळे असे या आईचे नाव आहे.

नाशिक - तिसरी देखील मुलगीच झाली, या कारणास्तव आईनेच १० दिवसाच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील ही घटना आहे. अनुजा काळे असे या आईचे नाव आहे.

तुनजा काळेविरोधात पतीने केलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुजा काळे यांना पोलिसांनी अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून बाळासाहेब काळे हे आडगाव परिसरातील रहिवासी आहेत. ते दिव्यांग असून कृषी सहायक अधिकारी म्हणून त्यांची नाशिकच्या कृषी विभागात ते कार्यरत आहे.
३ दिवसांपूर्वी काळे यांच्या राहत्या घरात त्यांच्या १० दिवसाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. मुलीच्या शवविच्छेदन अहवालात तिचा गळा आवळून हत्या झाल्याचे समोर आले. यावरून पती बाळासाहेब काळे यांनी पत्नी अनुजा काळे हिच्या विरोधात मुलीची हत्या केल्याचा गुन्हा आडगाव पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

धक्कादायक! तिसरी देखील मुलगीच झाल्यामुळे आईनेच केली १० दिवसाच्या मुलीची गळा दाबून हत्या
पोलीसांनी देखील अनुजा काळे हिला अटक करून चौकशी सुरू केली आहे. बाळासाहेब काळे यांच्या एका मुलीचा काही महिन्यांपूर्वी आजारामुळे मृत्यू झाला आहे. तर, दुसरी ७ वर्षाची मुलगी मधुमेह रुग्ण आहे. अशात जन्माला आलेल्या तिसऱ्या मुलीचा द्वेष करून अनुजा हिने मी घरी नसतांना मुलीची हत्या केली, असे बाळासाहेब काळे यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Intro:Body:

नाशिक न्यूज फ्लॅश

- तिसरी मुलगी झाली या कारणास्तव आईने १० दिवसाच्या मुलीचा गळा दाबून केली हत्या

- नाशिकच्या आडगाव परिसरातील धक्कादायक घटना

- आई अनुजा काळे विरोधात पतिने केलेल्या तक्रारीनूसार आडगाव पोलिस ठाण्यात रात्रि उशिरा गुन्हा दाखल

- आरोपी आई अनुजा काळे अटकेत..


Conclusion:
Last Updated :Jun 3, 2019, 11:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details