महाराष्ट्र

maharashtra

तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून मनसेचे बिटको रुग्णालयासमोर आंदोलन

By

Published : Sep 6, 2020, 3:17 PM IST

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या नाशिक शहरामध्ये सध्या कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नाही. नाशिक महानगरपालिकेला पीएम केअर फंडातून तब्बल सतरा व्हेंटिलेटर देण्यात आले. मात्र, पालिकेतील अनागोंदी कारभारामुळे हे व्हेंटिलेटर नाशिकच्या बिटको रुग्णालयात धूळ खात पडून आहेत. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बिटको रुग्णालयाबाहेर तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून आंदोलन केले.

MNS Agitation
मनसे आंदोलन

नाशिक - महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे व्हेंटिलेटर अभावी नाशिककरांना आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील व्हेंटिलेटरचे वास्तव समोर आल्यानंतर नाशिकमधील राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. आज मनसेने (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) नाशिकच्या बिटको रुग्णालयाबाहेर आंदोलन करून तत्काळ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

मनसेचे तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून आंदोलन

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या नाशिक शहरामध्ये सध्या कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नाही. नाशिक महानगरपालिकेला पीएम केअर फंडातून तब्बल सतरा व्हेंटिलेटर देण्यात आले. मात्र, पालिकेतील अनागोंदी कारभारामुळे हे व्हेंटिलेटर नाशिकच्या बिटको रुगणल्यात धूळ खात पडून आहेत. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बिटको रुग्णालयाबाहेर तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून आंदोलन केले. संतप्त पदाधिकारी आणि नाशिककरांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधितांचा आकडा 40 हजार पार गेला आहे. तर, 514 जणांचा अद्याप बळी गेला आहे. जिल्ह्यात रोज 1 हजाराहून अधिक नवीन कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेड मिळण्यासाठी हॉस्पिटलच्या दारोदारी फिरण्याची वेळ येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details