महाराष्ट्र

maharashtra

Kishori Pednekar : आघाडीचा लाखोंचा मोर्चा निघणार ; सरकारने जाहिराती-इव्हेन्टचे ऑडिट द्यावे - किशोरी पेडणेकर

By

Published : Dec 13, 2022, 8:59 AM IST

माजी माहापौर किशोरी पेडणेकर (Former Mayor Kishori Pednekar) यांनी काल झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबरला मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती दिली. शिंदे सरकारच्या विरूद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच घटक पक्षांचा हा मोर्चा असेल, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली. संयुक्त मोर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली निघणार (Kishori Pednekar on MVA march against Shinde Govt) आहे.

Kishori Pednekar
किशोरी पेडणेकर

मुंबई :

प्रतिक्रिया देताना माजी महापौर किशोरी पेडणेकर

महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबरला मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्च्याबाबत सोमवारी बैठक झाली. या बैठकीत तयारीवर चर्चा करण्यात आली. हा मोर्चा लाखोंचा असेल अशी माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या व मुंबईच्या माजी माहापौरकिशोरी पेडणेकर (Former Mayor Kishori Pednekar) यांनी दिली. तसेच सध्याच्या सरकारकडून तुम्ही ज्या जाहिराती करत आहात, जे इव्हेन्ट करत आहात त्याचेही ऑडिट करून लोकांना द्या, अशी मागणी पेडणेकर यांनी (MVA march against Shinde Government on 17 December ) केली.

लाखोंचा मोर्चा असेल :१७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता जिजामाता उद्यान (राणीचा बाग) भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस पर्यंत होत असलेल्या महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद तसेच राज्यात होत असलेल्या भ्रष्टाचार शिंदे सरकारच्या विरूद्ध महाविकास आघाडी शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष व इतर घटक पक्ष यांच्यातर्फे संयुक्त मोर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली निघणार (MVA march against Shinde Government) आहे.

मोर्चाची पूर्व तयारी : मोर्चाची पूर्व तयारी करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर घटक दल कामाला लागले आहे. याच अनुषंगाने मुंबई महापालिका मुख्यालयात शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार अनिल परब, आमदार सचिन अहिर, आमदार अजय चौधरी यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत प्रत्येक शिवसेना शाखेमधून महिला आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने कसे आणायचे, यावर चर्चा झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच घटक पक्षांचा हा मोर्चा असल्याने लाखोंचा हा मोर्चा असेल, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी (Kishori Pednekar on MVA march against Shinde Govt) दिली.

निर्भयाच्या गाड्या कुठे गेल्या : मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्भया पथक बनवण्यात आले होते. या पथकाच्या गाड्या मुंबईत जागोजागी उभ्या होत्या. या गाड्या कुठे गेल्या, असा प्रश्न पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. हा आरोप प्रत्यारोप नसून आम्ही तुम्हाला वस्तुस्थिती सांगत आहोत. त्यात सरकारने बदल करून त्या गाड्या त्या स्पॉटवर उभ्या कराव्यात अशी मागणी पेडणेकर यांनी केली. तसेच निर्भया फंडाचे ऑडिट करण्याची मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. यावर बोलताना सर्वांचे ऑडिट करा, पण त्याचबरोबर तुम्ही ज्या जाहिराती करत आहात, जे इव्हेन्ट करत आहात त्याचेही ऑडिट करून लोकांना द्या, अशी मागणी पेडणेकर यांनी (MVA march on 17 December) केली.

ABOUT THE AUTHOR

...view details