महाराष्ट्र

maharashtra

Farm Laws Repealed : कृषी कायदे रद्दच्या घोषणेनंतर नाशकात शेतकरी संघटनांकडून जल्लोष

By

Published : Nov 20, 2021, 1:01 AM IST

Updated : Nov 20, 2021, 1:13 AM IST

कृषी कायदे रद्द झाल्यानंतर नाशिकमध्ये वेगवेगळे संघटनांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला. या वेळी या आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या सर्व शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

शेतकरी संघटनांकडून जल्लोष
शेतकरी संघटनांकडून जल्लोष

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन कृषी कायदे रद्द (Farm Laws Repealed) केल्याच्या घोषणेनंतर आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या महाविकास आघाडीचे नेते व शेतकरी संघटनांनी (Farmers Association) जल्लोष केला. शालिमार येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंनदोत्सव साजरा करण्यात आला. कृषी कायदे रद्द झाल्यानंतर नाशिकमध्ये वेगवेगळे संघटनांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला. या वेळी या आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या सर्व शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

नाशकात शेतकरी संघटनांकडून जल्लोष


आंदोलनात मृत्यू झालेल्यांना श्रद्धाजंली

केंद्र सरकारला शेतकर्‍यांसमोर जुकावे लागले असून कृषी कायदे रद्द करावे लागले. पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केली. त्यानंतर देशभरात या कायद्यांना विरोध करणार्‍या शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी आंनदोत्सव साजरा केला. महाराष्ट्रात किसान सभेने या कायद्यांविरोधात गल्लीपासून दिल्लीपर्यंत रान पेटवले होते. शिवाय महाविकास आघाडीनेही कृषी कायद्यांना विरोध केला होता. कायदा रद्द झाल्याने जल्लोष करण्यात आला. शेतकरी संघटना, किसान सभा, आयटक, यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते सहभागी झाले. यावेळी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.

हेही वाचा -Farm laws to be repealed : तरीही शेतकरी आंदोलन सुरूच राहणार...वाचा काय म्हणतात राकेश टिकैत

Last Updated : Nov 20, 2021, 1:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details