महाराष्ट्र

maharashtra

सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्याची स्थापना; छत्रपती संभाजी राजेंचे प्रतिपादन

By

Published : Nov 1, 2022, 5:50 PM IST

सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्याची स्थापना झाली असून, महाराष्ट्रातील गावा-गावांमध्ये स्वराज्य संघटनेची बांधणी करण्यासाठी संभाजी राजे यांनी गाव तिथे शाखा, घर तिथे स्वराज्य अशा विविध शाखांचे उद्घाटन नाशिक जिल्ह्यात केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

छत्रपती संभाजी राजे
छत्रपती संभाजी राजे

सिन्नर (नाशिक) - सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्याची स्थापना झाली असून, महाराष्ट्रातील गावा-गावांमध्ये स्वराज्य संघटनेची बांधणी करण्यासाठी संभाजी राजे यांनी गाव तिथे शाखा, घर तिथे स्वराज्य अशा विविध शाखांचे उद्घाटन नाशिक जिल्ह्यात केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

छत्रपती संभाजी राजे

अन्यायाविरोधात लढा उभारण्यासाठी स्वराज्य -महाराष्ट्रातील गावागावांत स्वराज्य संघटनेची बांधणी करण्यासाठी दसऱ्यानंतर सीमोल्लंघन करून महाराष्ट्रात "स्वराज्य"चा विस्तार करण्यासाठी संभाजी राजे हे महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेले असून, त्यांनी 3 दिवसात नाशिक जिल्ह्यातील 75 शाखांचे उद्घाटन केले आहे. आज त्यांनी सिन्नर तालुक्यामधील शाखेचे उद्घाटन केले आहे. अजुनही 35 ठिकाणी जिल्ह्यात उद्घाटन करणार असल्याची माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी दिली आहे. स्वराज्याचे उद्दिष्ट एका शब्दात सांगू शकणार नाही. हे स्वराज्य खऱ्या अर्थाने कष्टकरी, कामगार, शेतकरी, गोर गरीब, त्यांच्या जो अन्याय होत आहे. त्या अन्यायाच्या विरोधाच्या लढा उभा करण्यासाठी हे स्वराज्य आहे. सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्याची स्थापना झाली असल्याची प्रतिक्रिया संभाजी राजे यांनी दिली आहे.

आमचं स्वराज्यचं काम चालू -शिवसेना नेमकी कोणाची?, शिवसेनेच्या सोळा आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा, धनुष्यबाण कोणाला मिळणार अशा विविध मुद्द्यांवर आज सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्ष वर आज सुनवानी होणार होती. 29 नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली यावर छत्रपती संभाजी राजे यांना विचारले आहे. त्यांचं त्यांचे चालू आहे आपणसुद्धा मजा बघूया, आमचे स्वराज्यचे काम चालू आहे असे सांगून या विषयाला संभाजी राजे यांनी बगल दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details