महाराष्ट्र

maharashtra

चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर पुलावरून खाली कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

By

Published : Oct 7, 2020, 1:02 PM IST

खडीने भरलेल्या डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि डंपर पुलावरून खाली कोसळला. येवला-नांदगाव रस्त्यावर झालेल्या या अपघातात डंपरच्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला.

dumper accident on yeola nandgaon road, one died, one injured
चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर पुलावरुन खाली कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

येवला (नाशिक) - खडीने भरलेल्या डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि डंपर पुलावरून खाली कोसळला. येवला-नांदगाव रस्त्यावर झालेल्या या अपघातात डंपरच्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. तर, डंपर चालक जखमी झाला आहे. दीपक बलराम सोनवणे (वय २५) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर सोमनाथ पोपट मोरे (वय ४०) असे जखमीचे नाव आहे.

अपघातानंतरचे दृश्य....

मिळालेल्या माहितीनुसार, सद्या येवला-नांदगाव रस्त्याचे काम सुरू आहे. अशात एक डंपर वेगाने नांदगावकडे निघाला होता. तेव्हा चालक सोमनाथ याचे डंपरवरील नियंत्रण सुटले आणि राजापूर गावाच्या पुढे असलेल्या पुलावरून डंपर खाली कोसळला. यात क्लिनर दीपक याचा जागीच मृत्यू झाला. तर, चालक सोमनाथ जखमी झाला.

जखमी सोमनाथला राजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सोमनाथने रुग्णालयातून पळ काढला. सद्या येवला-नांदगाव रस्त्याचे काम सुरू असून डंपर चालक हे सुसाट वेगाने वाहने चालवत आहे. यामुळे नागरिकांना या रस्त्याने जाताना भीती वाटत आहे.

हेही वाचा -केळी वाहतूक करण्याऱ्या ट्रकला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

हेही वाचा -हॉटेल सुरू होताच पहिल्याच दिवशी नाशिककरांनी मारला मिसळवर ताव

ABOUT THE AUTHOR

...view details