महाराष्ट्र

maharashtra

Bogus doctor - कोरोना काळात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, 155 डॉक्टरांवर कारवाई

By

Published : Sep 7, 2021, 1:15 AM IST

नाशिक जिल्ह्यातील काही बोगस डॉक्टरांनी कोरोना काळाचा फायदा उचलल्याचे समोर आले आहे. अशा महाभागांनी या अडचणीच्या काळात आपल उखळ पांढरे करून घेतले आहे. मात्र, काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडली असून, या अंतर्गत जिल्ह्यात तब्बल 155 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक जिल्हा परिषद भवन
नाशिक जिल्हा परिषद भवन

नाशिक - कोरोना कळात संपूर्ण आरोग्य यंत्रणा व्यस्त असताना याचा फायदा नाशिक जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांनी उचलल्याचे समोर आले आहे. अशा महाभागांनी या अडचणीच्या काळात आपल उखळ पांढरे करून घेतले आहे. मात्र, काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडली असून, या अंतर्गत जिल्ह्यात तब्बल 155 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील 155 बोगस डॉक्टरांवर कारवाई

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केला होता. नाशिक शहराबरोबर ग्रामीण भागात लाखो लोकांना कोरोनाची लागण झालीआहे. अशाच परिस्थितीत सरकारी हॉस्पिटल आणि खाजगी हॉस्पिटलही फुल होते. जिल्ह्यातील आरोग्य विभागही या कामात गुंतलेला होता. या गोष्टीचा फायदा घेत आदिवासी भागात डिग्री नसलेल्या अनेक बोगस डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करत आपले उखळ पांढरे करून घेतले. आता, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणाने कारवाई सुरु करत जिल्ह्यातील 155 बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे.

बाजारात मिळणाऱ्या ताप,सर्दी,खोकल्यांच्या गोळ्यांचा वापर

आरोग्य विभागाने सर्व तालुक्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. आरोग्यसेवा न पोहचलेल्या आदिवासी व दुर्गम भागात प्रामुख्याने या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे समोर आले आहे. फेक डिग्रीच्या आधारे तात्पुरत्या दवाखाना सुरू करून स्वस्तात उपचार करण्याचे आमिष दाखवले जायचे व सर्दी, ताप, खोकला या मेडिकलमध्ये उपलब्ध गोळ्यांचा वापर या डॉक्टरांकडून केले जात होता. त्यात रोगाचे योग्य निदान होत असल्याने अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

अशी केली जाते कारवाई

बोगस डॉक्टरांबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्याची खातरजमा करण्यासाठी या तक्रारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते. वैद्यकीय अधिकाऱ्यांची खात्री झाल्यास संबंधित बोगस डॉक्टरला नोटीस देऊन त्याच्याकडील वैद्यकीय कागदपत्रांची मागणी केली जाते. मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाते.

कोरोना रुग्णांवर उपचार

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात कोरोना काळात या बोगस डॉक्टरांनी चांगलेच हाथ धूऊन घेतले आहेत. कोरोना रोगाचे निदान न करता त्यांनी रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यातून अनेक रुग्णांची गंभीर परिस्थिती झाली आहे. तर, अनेकजण दगावल्याच्याही घटना घडल्या आहेत.

तालुकानिहाय बोगस डॉक्टरांवर कारवाई

येवला 15,इगतपुरी 18,माालेगाव 12,सुरगाणा 26,बागलाण 24,कळवण 22,त्र्यंबकेश्वर 7,सिन्नर 4,नांदगाव 5,दिंडोरी 6,पेठ 2,देवळा 3,चांदवड 4,निफाड 5.

ABOUT THE AUTHOR

...view details