महाराष्ट्र

maharashtra

नाशिक : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा मोर्चा

By

Published : Dec 1, 2020, 4:00 PM IST

ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

agitation by akhil bharatiya mahatma phule samata parishad for various demands of obc in nashik
नाशिक : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा मोर्चा

नाशिक - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आम्हीही आग्रही असून आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या 27 टक्के आरक्षणाला धक्का लावू नये, अशी भूमिका घेत आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव समितीच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी व ओबीसींचे आरक्षण अबाधीत राहावे, यासह आोबीसींच्या विविध मागण्यासांठी तहसिदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी कोणाताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे आंदोलन

मराठा समाज आमचा मोठा भाऊ -

मराठा समाज आमचा मोठा भाऊ असून ओबीसींना मिळालेले 27 टक्के आरक्षण हे तुटपुंजे आहे. यात 400 पेक्षा जास्त जाती आहेत. मुळात जातीनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाला आरक्षण द्यावे याबाबत विचार व्हावा, तसेच मराठा समाज आमचा मोठा भाऊ असून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणीही आंदोलनकांनी यावेळी केली.

हेही वाचा - बॉलिवूडला कोणी मुंबईबाहेर नेऊ शकत नाही - चंद्रकांत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details