महाराष्ट्र

maharashtra

नंदुरबारमध्ये 27 कोरोनाबाधित वाढले; एकूण रुग्णसंख्या 479 वर

By

Published : Jul 27, 2020, 11:35 AM IST

रविवारी नंदुरबारमध्ये 27 कोरोनाबाधित रुग्ण वाढले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 479 वर पोहोचली आहे. 27 जणामध्ये नंदुरबार शहरातील 16, शहाद्यातील 7, तळोद्यातील 3 आणि नवापूर येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.

nandurbar corona update
नंदुरबार कोरोना अपडेट

नंदुरबार- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रविवारी एकाच दिवशी तब्बल 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित रुग्णांमध्ये नंदुरबार येथील एका 12 वर्षीय बालकाचा तर तळोद्यातील एका 16 वर्षीय युवकाचा समावेश आहे. एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाल्यानंतर पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर नंदुरबार शहरातील एका बाधिताचा उपचार घेताना सकाळी मृत्यू झाला. जिल्ह्यात मृतांची संख्या दोनने वाढली असून आतापर्यंत कोरोनाचे 24 बळी गेले आहेत. नंदुरबार तालुक्यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 479 वर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता बाधितांचा आकडा 500 च्या वर लवकर पोहोचण्याची शक्यता आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. दिवसेंदिवस येणार्‍या अहवालात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने नंदुरबार जिल्हा आता रुग्णांच्या आकडेवारीत पाचशेच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा ही दोन शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. दररोज या शहरांमध्ये बाधित रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे.

तीन दिवसात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार येथील सराफ बाजारातील 48 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. या रुग्णाला शुक्रवारी (24 जुलै) च्या दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, रविवारी सकाळी या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सायंकाळी आलेल्या अहवालात एकाच दिवशी तब्बल 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नंदुरबार येथील देसाईपुरा भागात सुयोग नगरातील 66 वर्षीय महिलेचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे मृतांची संख्या जिल्ह्यात 24 वर पोहोचली आहे.

दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये नंदुरबार शहरातील 16 जणांचा तर शहाद्यातील 7 जणांचा आणि तळोद्यातील 3, नवापूरातील 1 जणाचा समावेश आहे. नंदुरबार येथील स्वराज्य नगरातील 55 वर्षीय पुरुष, तांबोळी गल्लीतील 36 वर्षीय पुरुष, गणेश नगर कोकणी हिल परिसरातील 12 वर्षीय बालक व 41 वर्षीय पुरुष, देसाईपुरा भागात 60 वर्षीय पुरुष, जुनी सिंधी कॉलनीत 32 वर्षीय महिला व 60 वर्षीय महिला, अमृत चौक देसाईपुरात 60 वर्षीय पुरुष, शिरीष मेहता रोड परिसरात 72 वर्षीय पुरुष, हिंगलाजमाता मंदिर परिसरात 33 वर्षीय पुरुष, पटेलवाडीत 64 वर्षीय पुरुष, हाटदरवाजा परिसरात 74 वर्षीय पुरुष, मोठा माळीवाड्यात 59 वर्षीय पुरुष व माळीवाडा भागात 65 वर्षीय पुरुष आणि नंदुरबारमध्ये 57 वर्षीय पुरुषांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत.

शहादा शहरात गरीब नवाज कॉलनीत 58 वर्षीय पुरुष, साजरा चौकात 70 वर्षीय महिला, विजय नगरात 50 वर्षीय पुरुष, रामरहिम नगरात 56 वर्षीय पुरुष, इंदूबाई नगरात 48 वर्षीय महिला, खेतिया रोड परिसरात 70 वर्षीय पुरुष, शहादा शहरात 54 वर्षीय पुरुष, तळोदा येथील श्रीराम नगरात 48 वर्षीय पुरुष, स्मारक चौकात 16 वर्षीय युवक, खाज्या नाईक चौकात 28 वर्षीय तरुण आणि नवापूर येथील जनता पार्कमध्ये 36 वर्षीय पुरुष असे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

प्रशासनाने बाधितांचा परिसर कंटनमेंट झोन म्हणून तयार केला असून बाधितांचा संपर्कातील व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे. तसेच परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात बाधितांचा आकडा 479 झाला असून त्यापैकी 24 जणांचा मृत्यू झाला आहे. 298 जणांनी कोरोनावर मात करुन संसर्गमुक्त झाले असून 145 रुग्ण उपचार घेत आहेत.

एकाच दिवशी 11 जण संसर्गमुक्त

रविवारी 11 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात नंदुरबार येथील मुजावर मोहल्ल्यातील एक व्यक्ती, पटेलवाडीतील एक व्यक्ती, देसाईपुरा भागातील एक व्यक्ती, श्रॉफ हायस्कूल परिसरातील एक व्यक्ती, विमल हौसिंग सोसायटीतील एक व्यक्ती, रायसिंग पुरा भागवातील तीन व्यक्ती, मोठा माळीवाडा परिसरातील एक व्यक्ती, चौधरी गल्लीतील एक व्यक्ती आणि लोकमान्य कॉलनीतील एक व्यक्ती असे 11 जण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details