महाराष्ट्र

maharashtra

संचारबंदी काळात कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

By

Published : Apr 11, 2020, 9:55 AM IST

नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी आपले कार्य बजावीतांना तंदुरुस्त राहावे. यासाठी शहादा तालुक्यातील सर्व पोलीस अधिकारी, एस आर पी एफ जवान व होमगार्ड यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

health checkup
संचारबंदी काळात कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

नंदुरबार - कोरोनामुळे देशावर व राज्यावर आलेल्या संकटाशी नेहमी सामना करणारे पोलीस प्रशासन जनतेची काळजी घेत असतात. मात्र, त्यांनीदेखील आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून प्रशासनाच्यावतीने त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

संचारबंदी काळात कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी आपले कार्य बजावीतांना तंदुरुस्त राहावे. यासाठी शहादा तालुक्यातील सर्व पोलीस अधिकारी, एस आर पी एफ जवान व होमगार्ड यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी 90 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना तंदुरुस्तीची अहवाल दिले व आपले कार्य बजावत यांना कुठली खबरदारी घ्यावी, मास्क कशा पद्धतीने वापरावे त्याचप्रमाणे त्यांनी सॅनिटायजर हातांना कसे लावावे, याबाबतदेखील डॉक्टरांनी माहिती दिली.

एकंदरीतच जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांची योग्य ती काळजी घेऊन कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवित आहेत. तसेच हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविला जाईल अशी माहिती प्रशासनाच्याॉवतीने देण्यात आली. त्याचप्रमाणे डॉक्टरांनीदेखील सर्व कर्मचारी तंदुरुस्त आहेत असा अहवाल दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details