महाराष्ट्र

maharashtra

मोठ्या आवाजाच्या 'सायलेन्सर'वाल्या बुलेटवर वाहतूक शाखेची धडक कारवाई

By

Published : Dec 23, 2020, 4:46 PM IST

Updated : Dec 23, 2020, 5:18 PM IST

नंदुरबारमध्ये बुलेटला मोठ्या आवाजवाले सायलेन्सर लावणाऱ्या चालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

कारवाई करताना
कारवाई करताना

नंदुरबार - वाहनांना कर्णकर्कश आणि आवाजी सायलेन्सर लावत ध्वनीप्रदूषण करणाऱ्या बुलेट चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी अचानक सुरू केलेल्या या मोहिमेत दिवसभरात आठ जणांवर कारवाई करुन दंड ठोठावण्यात आला आहे.

बोलताना पोलीस निरीक्षक

वाहतूक शाखेची धडक मोहीम

गेल्या वर्षाभरात बुलेट मोटारसायकल वापर करणारे काहीजण मोठे आवाज करणारे सायलेन्सर लावत शहरात हिंडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यातून मोठमोठ्या आवाजाच्या सायलेन्समधून अचानक निघणारे फटाके इतरांना त्रासदायक ठरत होते. याबाबत सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या.

या ठिकाणी झाली कारवाई

यांतर्गत शहरातील नेहरु चौक, बसस्थानक, अंधारे चौक, गांधी पुतळा, धुळे चौफुली, करण चौफुली याठिकाणी ही कारवाई झाली. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरप्रकरणी 200 रुपयांचा दंड आहे. परंतु, हा दंड करण्याऐवजी सायलेन्सर बदलण्याचे आदेश वाहतूक शाखेकडून देण्यात आले.

बुलेट चालकांकडून सहकार्य

यानुसार एका दुचाकीस्वाराने तातडीने दुकानात जाऊन संबधित मोटारसायकल कंपनीचे सायलेन्सर बसवून घेतल्याचे निदर्शनात आले. ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी सांगितले.

अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई

शालेय विद्यार्थी तथा अल्पवयीन मुले दुचाकी वाहन चालविताना आढळून आल्यास त्यांच्यावर व पालकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी दिले आहे.

हेही वाचा -नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात सिझरचे प्रमाण अधिक

हेही वाचा -डंपर आणि दुचाकीत भीषण अपघात; आई ठार तर मुलागा आणि नात जखमी

Last Updated : Dec 23, 2020, 5:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details