महाराष्ट्र

maharashtra

नंदुरबारमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 555 वर; 31 जणांचा मृत्यू

By

Published : Aug 1, 2020, 11:14 AM IST

शुक्रवारी 9 रुग्णांची वाढ झाल्यामुले रुग्णसंख्या 555 वर पोहोचली आहे. सध्या 130 रुग्णांवर उपचार सुरु असून 31 जणांचा मृत्यू झालाय. शुक्रवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 4 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

nandurbar corona update
नंदूरबार कोरोना अपडेट

नंदुरबार- जिल्ह्यात शुक्रवारी 9 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. नवापूर येथील 70 वर्षीय कोरोनाबाधित वृध्दाचा मृत्यू झाला आहे. 4 जणांना संसर्गमुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातुन सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 555 वर पोहोचली असून मृत्यू झालेल्यांची संख्या 31 झाली आहे.

दिवसेंदिवस नंदुरबार जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी 9 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये नंदुरबार शहरातील विद्यानगर येथील 56 वर्षीय पुरूष, शिनकर नगरातील 38 वर्षीय पुरूष, 20 वर्षीय युवती, 10 वर्षीय मुलगा, अहिल्याबाई विहीर परिसरातील 54 वर्षीय, नंदुरबार तालुक्यातील शनीमांडळ येथील 65 वर्षीय वृध्द महिला, दहिंदुले येथील 76 वर्षीय शहादा तालुक्यातील सिद्धार्थ नगर येथील 57 वर्षीय पुरूष, संभाजी नगरातील 67 वर्षीय अशा 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

नवापूर येथील इंदिरा नगरातील 70 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. शहादा येथील कुंभारगल्लीतील 43 वर्षीय पुरूष, 17 वर्षीय युवक, मच्छिबाजार येथील 48 वर्षीय तसेच नंदुरबार येथील जुनी भोईगल्लीतील 33 वर्षीय पुरुष कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 555 वर पोहोचली असून कोरोनामुळे 31 लोकांचा मृत्यू झालाय. सध्या 130 बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान,राज्यात शुक्रवारी 10320 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. रुग्णांची एकूण संख्या आता 4 लाख 22 हजार 118 अशी झाली आहे. 7543 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण 2 लाख 56 हजार 158 रुग्ण बरे झाल्याने त्यांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 50 हजार 662 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details