महाराष्ट्र

maharashtra

Nandurbar News : वीज पुरवठा सुरळीत करताना शॉक लागून लाईनमनचा मृत्यू, नातेवाईकांची चौकशी मागणी

By

Published : Feb 6, 2023, 9:34 AM IST

नंदुरबार जिल्ह्यातील वडखुट येथे खंडित वीज पुरवठा सुरळीत करताना विजेचा शॉक लागून लाईनमनचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वीज पुरवठा सुरू करताना हा लाईनमन खांबावर चढला होता. मृत्यू झाल्याची घटना घडल्याने वडखुट येथे ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Nandurbar News
शॉक लागुन लाईनमनचा मृत्यू

शॉक लागुन लाईनमनचा मृत्यू

नवापूर ( नंदुरबार ) : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील वडखुट येथील वांत्या आवश्या गावीत यांच्या शेतात असलेल्या १६ के.व्ही. वीज पोलवर गेल्या दोन दिवसापासून काही तांत्रिक बिघाड झाले होते. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करताना विजेचा शॉकपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास वीज वितरण कंपनीचे लाईनमन अनिल फत्तेसिंग गावीत रा.नागझिरी ता.नवापूर हे वीज कनेक्शन दुरूस्त करण्यासाठी आले होते. मात्र यात त्यांचा मृत्यू झाला.

खांबावर चढून वीज दुरुस्तीचे काम :खांबावर चढून वीज दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाला. यात लाईनमन अनिल गावीत यांना विजेचा जोरात शॉक लागला. त्यानंतर वीज पोलवर चिटकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दि. 5 दुपारच्या सुमारास घडली. त्यानंतर ही घटना वार्‍यासारखी गावात पसरताच बघ्यांची गर्दी झाली होती.



विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल :याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उप.निरिक्षक भुषण बैसाणे, पो.कॉ.अनिल राठोड, अतुल पानपाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. गावात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात पोलिसांकडून करण्यात आले आहे. लाईनमन अनिल गावीत हे नवापूर येथील वीज वितरण कंपनी कार्यालयात नौकरी करत होते. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांचा असा दुदैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



नातेवाईकांकडून चौकशीची मागणी :विद्युत पुरवठा सुरळीत करताना वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिवारातील कर्ता पुरुष गेल्याने व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे. त्याचबरोबर दोशींवर कारवाई व्हावी अशी देखील मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे. बराच वेळ मृतदेह खांबावर लोंबकळत होता.

हिटरचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू :बीडच्या केस तालुक्यातील पिंपळगाव येथे रात्री तीन वाजता हिटरचा शॉक लागून पती-पत्नीचा दि. 25 जानेवारीला मृत्यू झाला होता. पाणी तापवण्याच्या हिटरला चिटकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे आणि पत्नी सिंधूबाई ज्ञानेश्वर सुरवसे अशी त्यांची नावे आहेत. रात्री तीन वाजता बाजाराच्या ठिकाणी जायचे होते. पहाटे लवकर उठून पाण्याचे हिटर बाथरूममध्ये लावले व ब्रश करत ज्ञानेश्वर सुरवसे पत्नीला बाकीची आवराआवर करण्याची सांगत बाथरूमकडे आंघोळीसाठी गेले. तर त्या ठिकाणी त्यांना त्या हिटरचा शॉक बसला. त्यांचा आरडाओरडा ऐकून त्यांची पत्नी सिंधुबाई सुरवसे या त्यांच्याकडे धावत गेल्या. तर यांना विजेचा शॉक लागल्यामुळे त्यांनी त्यांना पकडले. यात दोघांचा देखील विजेचा शॉक लागला व दोघेही मरण पावले.

हेही वाचा :Melghat Tiger: मेळघाटात भर रस्त्यात व्याघ्र दर्शन; नागरिकांत धास्तीचे वातावरण

ABOUT THE AUTHOR

...view details