महाराष्ट्र

maharashtra

Case against Nandurbar collector : शासनाची तब्बल 10 कोटींची फसवणूक; तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळेंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 12:20 PM IST

Updated : Oct 6, 2023, 7:25 PM IST

Case against Nandurbar collector : नंदुरबारचे तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्यावर शासनाच्या 10 कोटी 82 लाख रुपयांच्या महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचे तहसीलदार अनिल बन्सी गवांदे यांनी तक्रार दिली आहे.

balaji manjule
तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे

प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक

नंदुरबार Case against Nandurbar collector:बालाजी मंजुळे हे 22 फेब्रुवारी 2019 ते 18 जुलै 2019 या कालावधीत नंदुरबार जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. यावेळी शासनाने त्यांना महसुली उद्दीष्ट दिले होते. हे महसुली उद्दीष्ट साध्य करण्यासाठी मंजुळे यांनी अनधिकृत बिनशेती वापर शर्त बंद प्रकरणी भोगवटादार वर्ग 2, धारणा अधिकार भोगवदार वर्ग 1 मध्ये रुपांतर करणे अशा एकूण 16 प्रकरणात सहाय्यक जिल्हा निबंधक व जिल्हाधिकारी मुद्रांक नंदुरबार यांच्याकडून मूल्यांकन अहवाल न घेता नजराना, रुपांतर अभिमूल्य रक्कम निश्‍चित करुन किंवा इतर अनियमीतता भरुन शासनाचे 10 कोटी 82 लाख 64 हजार 220 रुपये इतके आर्थिक नुकसान मंजुळे यांनी केले आहे. तसंच याशिवाय इतर चार प्रकरणात त्यांनी शासकीय नियमांचे उल्लंघन केले आहे.

सन 2019 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी एकूण 16 प्रकरणात सहाय्यक जिल्हा निबंधक व जिल्हाधिकारी मुद्रांक नंदुरबार यांचेकडून मूल्यांकन अहवाल न घेता नजराना, रुपांतर अभिमूल्य रक्कम निश्‍चित करुन किंवा इतर अनियमीतता भरुन शासनाचे 10 कोटी 82 लाख 64 हजार 220 रुपये इतके आर्थिक नुकसान केले आहे. तसेच उर्वरीत चार प्रकरणात शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले. सदरचा आदेश पारित करतांना बनावट जावक क्रमांक आदेशावर नोंदविले. म्हणून या प्रकरणी शासन आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. - मनीषा खत्री, जिल्हाधिकारी

अधिकारांचा केला गैरवापर :आदेश देताना बनावट जावक क्रमांकाची नोंद त्यांच्यावर करण्यात आलीये. मंजुळेंनी जिल्हाधिकारी म्हणून प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा गैरवापर केला. स्वत:च्या स्वाक्षरीचा आदेश पारित करुन आदेशांना देण्यात आलेल्या क्रमांकावर व इतर प्रकरणांची नोंदही झालेली आहे. चौकशीत सदरचे प्रकरणे कार्यालयात दाखल न होताच आदेश तयार करण्यात येऊन बनावट दस्ताऐवजाद्वारे शासनाची फसवणूक करुन सदर रकमेचे नुकसान केले. मालमत्तेचे नुकसान करत शासनाची दिशाभूल केली. तसंच खोटे दस्तऐवज तयार करुन शासनाची फसवणूक केली. दरम्यान, बालाजी मंजुळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम 420, 167, 465, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच सदरील प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव करीत आहेत.

Last Updated : Oct 6, 2023, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details