महाराष्ट्र

maharashtra

कोरोनाचा सकारात्मक परिणाम - नंदुरबार शहर पोलीस हद्दीत गुन्ह्यांमध्ये घट

By

Published : Apr 4, 2020, 4:22 PM IST

कोरोनामुळे सुरु असलेल्या संचारबंदीचा सकारात्मक परिणाम दिसायला मिळाला. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली आहे.

नंदुरबार पोलीस ठाणे
नंदुरबार पोलीस ठाणे

नंदुरबार- जिल्ह्यातील शहर पोलीस ठाणे हे संवेदनशील पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात गुन्हे होत होते. मात्र, कोरोनामुळे संचारबंदी असल्याने गुन्ह्यांत मोठी घट झाली आहे. तर टाळेबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या वाहनांधारकावर दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी तीनशेहून अधिक वाहने जप्त केली आहे.

कोरोनाचा सकारात्मक परिणाम

शहरात मोठ्या प्रमाणावर मोटारसायकल चोरी, घरफोडी, हाणामारी, असे गुन्हे नंदुरबार शहरात घडत होते. मात्र, 23 मार्चला टाळेबंदी घोषीत झाल्यानंतर शहरातील गुन्ह्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. संचारबंदीमुळे नागरिक घरातच असल्यामुळे चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून गेल्या दहा दिवसात एकही चोरी किंवा घरफोडीचा गुन्हा नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात घडला नाही. तर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असून पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असल्यामुळे शहरात हाणामारी सारखे प्रकार देखील घडलेले नाहीत.

मात्र, संचारबंदीच्या काळात विनाकारण वाहनांवर फिरणारे किंवा संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या चार दिवसात विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून तीनशेपेक्षा अधिक वाहने वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केले आहेत.

या दहा दिवसात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एकही मोठा गुन्हा दाखल झाला नसून फक्त संचारबंदी संदर्भातील गुन्हे दाखल झाल्याची माहिती नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी दिली.

हेही वाचा -Coronaviurs: परराज्यातुन आलेल्या ऊसतोड 150 मजुरांची नंदुरबारच्या रनाळ्यात तपासणी

ABOUT THE AUTHOR

...view details