महाराष्ट्र

maharashtra

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीविरोधात नंदुरबारमध्ये काँग्रेसचे आंदोलन

By

Published : Jun 7, 2021, 8:07 PM IST

नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाभर इंधन दरवाढीविरुद्ध पेट्रोल पंपाच्या परिसरात आंदोलन करण्यात आले. नंदुरबार व नवापूर येथे आमदार शिरीष नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

नंदुरबार
नंदुरबार

नंदुरबार - नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाभर इंधन दरवाढीविरुद्ध पेट्रोल पंपाच्या परिसरात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच इंधन दरवाढ कमी व्हावी, यासाठी आंदोलन केले. जिल्ह्यातील नंदुरबार व नवापूर येथे आमदार शिरीष नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीविरोधात नंदुरबारमध्ये काँग्रेसचे आंदोलन

इंधनाचे दर कमी करण्याची मागणी

'केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व एल.पी.जी.गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ केलेली आहे. पेट्रोलने आधीच शंभरी पार केली आहे. तर डिझेल 92 रुपये लिटर झाले आहे. दरवाढ अशीच सुरु राहिल्यास डिझेलही शंभरी पार होईल. एल.पी.जी.गॅसच्या एका सिलिंडरची किंमत 900 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. या दरवाढीमुळे महागाई वाढली आहेत. महागाईमुळे देशातील सामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. यामुळे सामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र शासनाचा निषेध केला आहे. तरी केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीत केलेली दरवाढ तत्काळ मागे घेऊन सामान्य जनतेला दिलासा द्यावा', अशी मागणी आमदार शिरीष नाईक यांनी केली आहे.

हेही वाचा -LIVE Updates : पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील कंपनीला भीषण आग

ABOUT THE AUTHOR

...view details