महाराष्ट्र

maharashtra

टाळेबंदीतील तोटा भरुन काढण्यासाठी 'लालपरी'च्या फेऱ्यांमध्ये वाढ करणार - आगार प्रमुख

By

Published : Dec 21, 2020, 4:41 PM IST

टाळेबंदीमुळे तोट्यात गेलेली एसटी पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. उत्पन्न वाढीसाठी एसटीच्या फेऱ्या वाढविण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आगार प्रमुख मनोज पवार यांनी सांगितले.

नंदुरबार बसस्थानक
नंदुरबार बसस्थानक

नंदुरबार- टाळेबंदीमुळे तोट्यात गेलेली एसटी पुन्हा एकदा रस्त्यावर धावू लागली आहे. यात नंदुरबार आगाराने सात महिन्यातील नुकसान भरून काढण्यासाठी पूर्वीप्रमाणे दरदिवशी किमान अडतीस हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एसटी महामंडळ पूर्ववत होईल यासाठी आगार प्रमुखांकडून प्रयत्न सुरू आहेत.

अनेक अडचणीतून सुरु झाली बस सेवा

टाळेबंदीमुळे एसटीची सेवा बंद पडली होती. बंद पडलेली एसटी जून महिन्यापासून सुरू झाली. त्यानंतर ही बऱ्याच अडचणी आल्याने आठवड्यातून काही दिवस फेर्‍या होत असल्याचे चित्र होते. नंदुरबार आगारातून दरदिवशी प्रवास करणाऱ्या बसेस साधारण 12 लाख रुपयांचे महसूल गोळा करत होते.

हळूहळू लालपरी पूर्वपदावर

मागील पाच महिन्यांपासून नंदुरबार आगाराने एसटी बस आता पूर्वपदावर येताना दिसून येत आहे. नंदुरबार आगारातून सध्या 88 गाड्या विविध मार्गांवर धावत आहेत. यात दिवसभरात किमान 266 फेऱ्या पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती आगर प्रमुखांकडून देण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये समाधानी

नंदुरबार आगारात एकूण 233 वाहक व 217 चालक आहेत. या सर्वांना टाळेबंदीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. मात्र, आता एसटी महामंडळ पूर्ववत होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केली जात आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी 30 ते 35 हजार रुपयांपर्यंत एसटीच्या नंदुरबार आगाराची रोख रक्कम दिवसाला जमा होण्याची वेळ आली होती. पण, प्रवाशांच्या सातत्याने पाठबळ दिल्याने ही रक्कम आता आठ ते साडे आठ लाखपर्यंत पोहोचली आहे.

महसूल वाढीवर लक्ष

नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश या सीमावर्ती भागावर असल्याने राज्याबाहेर वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते त्याचबरोबर काही मार्गांवर रेल्वे सेवा बंद असल्याने त्याचा फायदा एसटी महामंडळाला होत आहे. दिवसाला किमान 155 शहरे गाव व पाड्यांच्या ठिकाणी बस सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर आगाराकडून महसूल वाढीवर भर देण्यात येत असल्याची माहिती नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी दिली.

हेही वाचा -केंद्राचा कृषी विधेयकाच्या विरोधात वंचित आघाडीचे धरणे आंदोलन

हेही वाचा -नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद

ABOUT THE AUTHOR

...view details