महाराष्ट्र

maharashtra

भास्करराव पाटील खतगावकरांवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा..

By

Published : Jan 22, 2020, 5:24 PM IST

माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी युवा पँथरच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Yuva Panther
युवा पँथरचे आंदोलन

नांदेड- भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी युवा पँथरच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आले.

युवा पँथरचे आंदोलन

हेही वाचा - 'त्या' विधानाचा विपर्यास केला; मंत्री अशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण

बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील साईबाबा विद्यालयातील विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणी आरोपींना पाठीशी घालून हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा संस्थाचालक भास्करराव पाटील खतगावकर यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांना सहआरोपी करावे आणि पोलिसांना न कळवता मुलीवर उपचार करणाऱ्या 'नांदेड क्रिटिकल केअर हॉस्पिटल'च्या सर्व डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी या आंदोलकांनी केली आहे.

हेही वाचा -विधवा महिलेला नांदवण्याचे आमिष दाखवून बलात्कार, आरोपीला अटक

युवा केंद्रप्रमुख राहुल प्रधान यांच्यासह युवा पँथरचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Intro:नांदेड : भास्करराव पाटील खतगावकर यांच्या विरुद्ध पोस्का कायद्याने गुन्हा दाखल करा.

- युवा पॅंथर चे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन.

नांदेड : बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील साईबाबा विद्यालयातील विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणी आरोपींना पाठीशी घालून हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थाचालक तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्याविरुद्ध पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा , सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांना सहआरोपी करावे.Body:मुलीवर पोलिसांना न कळवता उपचार करणाऱ्या नांदेड क्रिटिकल केअर हॉस्पिटल च्या सर्व डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी त्यांच्या वतीने आज पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.Conclusion:
युवा केंद्रप्रमुख राहुल प्रधान यांच्यासह युवा पॅंथरचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details