महाराष्ट्र

maharashtra

Ukraine Russia Crisis : युक्रेनमधील नांदेडच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत अशोक चव्हाण यांनी दिला धीर

By

Published : Feb 27, 2022, 1:17 PM IST

रशिया आणि युक्रेनमध्ये मागील आठवड्यापासून युद्ध सुरु झाले ( Ukraine Russia Crisis ) आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये नांदेडमधील विद्यार्थी अडकले आहे. त्याविद्यार्थ्यांशी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संवाद साधला ( Ashok Chavan Reassured Nanded Students ) आहे.

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

नांदेड -रशिया आणि युक्रेनच्या युद्धात ( Ukraine Russia Crisis ) महाराष्ट्रातील काही नागरिकांसमवेत विद्यार्थाही अडकले आहेत. त्यात नांदेडमधील 30 विद्यार्थी आहेत. उच्च शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांनी कीव्ह येथील शैक्षणिक संस्थांत प्रवेश घेतला आहे. रशियाने युद्धाची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रीयन विद्यार्थी भयभीत झाले आहेत. या विद्यार्थ्यांशी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे प्रत्यक्ष संवाद साधून धीर ( Ashok Chavan Reassured Nanded Students ) दिला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री अशोक चव्हाण विद्यार्थ्यांशी संवाद साधताना

विद्यार्थ्यांनी जी परिस्थिती ओढावली आहे, ती सर्व अशोक चव्हाण यांच्याकडे सांगितली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून आवश्यक जी काही मदत आहे, ती पोहचवण्यासाठी मी स्वत: संपर्क साधून आपल्याला सुखरूप भारतात कसे परत आणता येईल. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करत असल्याचे अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना म्हटलं. जिल्हा प्रशासनाच्या वतीने केंद्र सरकारला एक स्वतंत्र मदतीचे पत्र तात्काळ पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तेथील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक दिले असून तेही विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत.

हेही वाचा -Video : युक्रेनमध्ये ठाण्यातील 17 विद्यार्थी अडकले; युद्धजन्य परिस्थितीचा पाठवला व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details