महाराष्ट्र

maharashtra

नांदेड-अर्धापूर महामार्गावर ट्रक-दुचाकीचा अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी

By

Published : Nov 14, 2019, 6:43 PM IST

नांदेडकडून ट्रक अर्धापूकडे (के ए ३३ ए ७९५४) येत होता. हा ट्रक वसमतफाटा चौकातून अर्धापूर वळण रस्त्यावरून हिंगोलीकडे वळण घेत असताना अर्धापूरकडून नांदेडकडे येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली.

नांदेड-अर्धापूर महामार्गावर ट्रक दुचाकीचा अपघात

नांदेड - जिल्ह्यातील नांदेड-अर्धापूर महामार्गावरील वसमतफाटा महामार्ग सुरक्षा पथकाच्या चौकीच्या परिसरातील चौकात ट्रक-दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी पावने दोन वाजण्याच्या सुमारास घडला.

हेही वाचा-शबरीमला प्रकरणी पुनर्याचिका आता संविधानिक पीठाकडे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नांदेडकडून ट्रक अर्धापूकडे (के ए ३३ ए ७९५४) येत होता. हा ट्रक वसमतफाटा चौकातून अर्धापूर वळण रस्त्यावरून हिंगोलीकडे वळण घेत असताना अर्धापूरकडून नांदेडकडे येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. रुखमाजी रामजी गव्हाणे (वय-४३) व गणेश गोविंद गव्हाणे (वय-४२) हे त्या दुचाकीवरून प्रवास करत होते. यात रुखमाजी रामजी गव्हाणे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश गोविंद गव्हाणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पोलीस उपनिरिक्षक आर. आर रहेमान, ईश्वर राठोड, दिपक जाधव, राजकुमार व्यवहारे यांनी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

वसमत फाटा महामार्ग सुरक्षा पथकाच्या चौकीजवळ गेल्या चार वर्षांपासून एका गुन्हातील ट्रक उभा आहे. या ट्रकमुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. हा ट्रक तातडीने हलवण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

Intro:नांदेड अर्धापूर महामार्गावर ट्रक दुचाकीच्या अपघातात एक ठार एक जखमी....!

नांदेड: जिल्ह्यातील नांदेड-अर्धापूर महामार्गावरील वसमतफाटा महामार्ग सुरक्षा पथकाच्या चौकीच्या परीसरातील चौकात ट्रक-दुचाकीचा आपघात झाला असून यात दुचाकीवरील एकाचा जगीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा आपघात गुरुवारी दुपारी पावने दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे.Body:नांदेड अर्धापूर महामार्गावर ट्रक दुचाकीच्या अपघातात एक ठार एक जखमी....!

नांदेड: जिल्ह्यातील नांदेड-अर्धापूर महामार्गावरील वसमतफाटा महामार्ग सुरक्षा पथकाच्या चौकीच्या परीसरातील चौकात ट्रक-दुचाकीचा आपघात झाला असून यात दुचाकीवरील एकाचा जगीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा आपघात गुरुवारी दुपारी पावने दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

या आपघाताबाबत महामार्ग सुरक्षा पथकाकडून मिळालेली माहिती आशी की, नांदेड कडून ट्रक अर्धापूकडे (के.ए.३३ ए ७९५४)येत होता. हा ट्रक वसमतफाटा चौकातून अर्धापूर वळण रस्त्यावरून हिंगोलीकडे वळण घेत असतांना अर्धापूरकडून नांदेडकडे रुखमाजी रामजी गव्हाणे (वय-४३) व गणेश गोविंद गव्हाणे (वय-४२) दोघेही राहणार कलदगाव (ता अर्धापूर जि.नांदेड) आपल्या दुचाकीवरून (एम.एच.२६ एल ३४३३) जाता असतांना त्यांची दुचाकी वसमतफाटा चौकात आली असता ट्रकने जबर धडक दिली. यात रुखमाजी रामजी गव्हाणे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश गोविंद गव्हाणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पोलीस उपनिरिक्षक आर. आर रहेमान, ईश्वर राठोड, दिपक जाधव, राजकुमार व्यवहारे यांनी नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले.

वसमतफाटा महामार्ग सुरक्षा पथकाच्या चौकीजवळ गेल्या चार वर्षापासून एका गुन्हातील ट्रक उभा आहे. या ट्रक मुळे रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. हा ट्रक तातडीने हरविण्यात यावा. अशी मागणी होत आहे.Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details