महाराष्ट्र

maharashtra

Shivsena VBA Alliance : ठाकरे गट-वंचितच्या आघाडीने बदलणार समीकरणे? 'वंचित'ने सोडली होती तीन मतदारसंघांत छाप

By

Published : Jan 26, 2023, 9:47 PM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा शिवशक्ती अन् भीमशक्तीचा नवा प्रयोग सुरू झाला आहे. या प्रयोगाने नांदेड जिल्ह्यातील राजकीय गणितेही बदलणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत वंचितने नांदेड उत्तर, दक्षिणसह कंधार-लोहा मतदारसंघात लक्षणीय कामगिरी केली होती. त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Thackeray Group and Vanchit Alliance In Nanded
ठाकरे-आंबेडकर युती

नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणावर मान्य करताना

नांदेड :नांदेड जिल्ह्यात दिवंगत आमदार प्रकाश खेडकर यांच्या काळात शिवसेनेचे चांगले वर्चस्व होते. परंतु त्यांच्या निधनानंतर शिवसेनेची वाताहत झाली होती. २०१९ च्या विधानसभा भाजप शिवसेना एकत्र लढले. लोकसभेला एकमेकांसोबत असलेली अन् दीड लाखाहून अधिक मते घेतलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने विधानसभा स्वतंत्रपणे लढविली. नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण मतदारसंघात वंचित आणि शिवसेना या दोघांनीही चांगली मते खेचली होती. या ठिकाणी शिंदे यांना लाखाहून अधिक मते मिळाली असली तरी ठाकरे गट आणि वंचित येत्या निवडणुकीत चांगली टक्कर देऊ शकते. जिल्ह्यातील उर्वरित सहा मतदारसंघातही वंचितला दहा ते पंधरा हजार मते मिळाली होती.

कॅडर बेस वोटरचा धसका:आता उद्धव ठाकरे गटाशी युती केल्यानंतर कट्टर शिवसैनिक आणि वंचितचा कॅडर बेस वोटर असे समीकरण जुळवून येणार आहे. त्याचा परिणाम अनेक धक्कादायक निकालात दिसून येण्याची शक्यता असल्यामुळे दिग्गजांची चिंता वाढली आहे.


हदगावच्या जागेकडेही लक्ष :देगलूर मतदारसंघात वंचितच्या उत्तम इंगोले यांना ११ हजार ३४८ मते मिळाली होती. या ठिकाणी महाविकास आघाडीत लढलेल्या जितेंश अंतापूरकर यांना १ लाख ८ हजार ८४० मते होती. हदगावात काँग्रेसच्या माधवराव जवळगावकर यांना ७४ हजार मते होती, तर शिवसेनेचे बंडेखोर बाबूराव कोहळीकर यांनादुसऱ्या क्रमांकाची ६० हजार ६९२ मते होती. शिवसेनेचे नागेश आष्टीकर ४४ हजार मतांवर होते. वंचितच्या सुदर्शन भारती यांना १० हजार मते होती. त्यामुळे या मतदारसंघातही चित्रे पालटू शकते. किनवटमध्ये वंचितला ११ हजार ७६४, नायगावला मारोती कवळेंना २३ हजार, भोकरला नामदेव आयलवाड १७ हजार आणि मुखेडला जीवन दरेगावे या वंचितच्या उमेदवाराला ८ हजार मते मिळाली होती.


विजयाची रननीती :आमदार बालाजी कल्याणकर यांनी ६२ हजार ८८४ मते घेतली. तर तिसऱ्या क्रमांकावर वंचितच्या मुकुंदराव चावरे यांना २६ हजार ५६९ मते मिळाली होती. आता कल्याणकर हे शिंदे गटात गेल्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाकडून अन्य उमेदवार रिंगणात उतरेल किंवा वंचितला जागा सोडल्यास दोन्ही पक्षांची मते विजयाचा सोपान गाठण्यासाठी पुरेशी ठरतील.


सेना आणि वंचितची ताकद :नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसचे मोहन हंबर्डे यांनी ४६ हजार ९४३ मते होती. दुसऱ्या क्रमांकावर सेनेच्या राजश्री पाटील यांना ३७ हजार ६६ तर वंचितच्या फारुक अहमद यांना २६ हजार ७१३ मते मिळाली होती. या ठिकाणी ही दोन्ही पक्षांच्या मतांची बेरीज ही विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहे. तर कंधार-लोहा मतदारसंघात शेकापचे श्यामसुंदर शिंदे यांना १ लाख १ हजार ६६८ मते मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर वंचितचे शिवकुमार नरंगले होते. त्यांना ३७ हजार ३०६ मते मिळाली. सेनेच्या मुक्तेश्वर धोंडगे यांना ३० हजार ९६५ मत मिळाली होती.


‘वंचित’चा दबदबा :नांदेडमध्ये ‘वंचित’मुळे अशोक चव्हाण लोकसभा हरले होते. २०१९ मध्ये लोकसभेत भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांना ४ लाख ८६ हजार ८०६, काँग्रेसचे अशोकराव चव्हाण ४ लाख ४६ हजार ६५८ तर वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे यांना एक लाख ६६ हजार १९६ मते पडली. तर विधानसभेत उत्तरमध्ये शिवसेनेकडून आमदार बालाजी कल्याणकर यांनी ६२ हजार ८८४ मते घेतली. आता ते शिंदे गटात गेल्याने राजकीय चित्र वेगळे असेल.


हिंगोली :मागील लोकसभेत हिंगोली मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराने १.७४ लाख मते घेतली. तर कळमनुरीत वंचितचा उमेदवार तब्बल ६६,१३७ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होता. हिंगोली विधानसभेत वंचितला १९,८५६ तर वसमत विधानसभेत २५,३९७ मते मिळाली. ही सर्व मते आता शिवसेनेच्या उमेदवाराकडे वळल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

हेही वाचा :Pune Pimpri Chinchwad By Elections : पुणे-पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत चुरस!

ABOUT THE AUTHOR

...view details