महाराष्ट्र

maharashtra

Nanded Forest Department Action वन्यजीव अवयवांचा साठा जप्त, नांदेडच्या वन विभागाची कारवाई

By

Published : Aug 23, 2022, 10:54 PM IST

नांदेड येथील वन विभाग Nanded forest department व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो WCCB आणि TRA FFIC INDI यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये वन्यजीव अवयवांचा साठा confiscation of stocks of wildlife organs जप्त करण्यात आला आहे. वन्यजीव अवयव साठा जप्तीची ही नांदेडमधील पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

Nanded Forest Department Action
वन्यजीव अवयवांचा साठा जप्त

नांदेड येथील वन विभाग Nanded forest department व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो WCCB आणि TRA FFIC INDI यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये वन्यजीव अवयवांचा साठा confiscation of stocks of wildlife organs जप्त करण्यात आला आहे. वन्यजीव अवयव साठा जप्तीची ही नांदेडमधील पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

बनावटी ग्राहकाच्या मदतीने तस्करांना पकडलेमिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवार दि. 23 ऑगस्ट रोजी पहाटे उपवनसंरक्षक केशव वाबळे व तेंदू व कम्पाचे सहाय्यक वनसंरक्षक वी. एन. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जी. पोतुलवार यांच्या पथकाने वन्यजीवाच्या अवयवाची विक्री करणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई केली. वन विभागाच्या पथकातील एका सदस्याने बनावट ग्राहक बनून संपर्क साधला असता आरोपीने साडेतीन हजार प्रति नग दराने हत्था जोडी विक्री करीत असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सापळा रचून हत्था जोडीसहीत आरोपी स्वप्नील बाबुराव सूर्यवंशी वय ३६ वर्षे राहणार आंबेडकरनगर, नांदेड यास हुजूर साहिब रेल्वे स्टेशन नांदेड येथून ताब्यात घेतले.


दुकानातून वन्यप्राण्यांच्या अवयवांची विक्रीया आरोपीने दिलेल्या माहितीवरून त्यास वन्यजीवाच्या अवयवांचा पुरवठा करणारे व्यावसायिक आणखीन दोन जण असल्याचे समोर आले. त्यात आरोपी व्ही. व्ही. मोगडपल्ली, रा. वसंतप्रभा निवास, कैलाशनगर, नांदेड दुकान मालक व दुकानातील नौकर कैलाश पुरभाजी कदम, रा. निळा, पो.मरळक बु., ता. जि. नांदेड यांना श्रीनगर नांदेडमधील मोगडपल्ली मेडीको किराणा स्टोअर्स या दुकानावर वन विभागाचे पथकातील सदस्यांना बनावट ग्राहक बनवून हत्था जोडी मागणी केली असता त्यांने ७०० रुपये प्रती नग हत्था पल्ली, जोडी दिली. त्याचवेळी दुकानात धाड टाकून त्याला पकडले व त्यांच्या दुकानाची झडती घेतली असता त्यांच्याकडून ईतर तीन नग हत्था जोडी, पाया जोडी १५ नग व एक नग ब्लॅक कोरल हस्तगत केले.


काय आहे हत्था जोडीहत्था जोडी हे घोरपड या वन्यप्राण्याचे गुप्तांग आहे. घोरपड हे भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे परिशिष्ट I भाग II मधील वन्यप्राणी आहे. ब्लॅक कोरल हा परिशिष्ट I मधील भाग IV अ मधील प्राणी आहे. वरील तीनही आरोपीविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ कलम ४९ कलम ४९ ब व कलम ५२ नुसार वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास चालू आहे. या कारवाईमध्ये बी. एन. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सी. जी. पोतुलवार, वन्य जीव रक्षक अतिंद्र कट्टी, एस. टी. आलोने, एस. बी. शिंदे, रमेश राठोड, नामदेव पंढरे, डी. एन. सोनकांबळे, तुळशीराम मुसांडे, पांडुरंग लव्हाळे यांचा समावेश होता.

हेही वाचाIqbal Kaskar Health अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरची प्रकृती स्थिर, डॉक्टरांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details