महाराष्ट्र

maharashtra

‘लम्पी स्किन’मुळे आता जनावरांनाही पाळावं लागणार सोशल डिस्टन्सिंग

By

Published : Aug 8, 2020, 5:35 PM IST

Updated : Aug 8, 2020, 6:53 PM IST

जगभरात करोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या संसर्गाने मृत्यूचा आकडादेखील लाखाच्या घरात गेला आहे. त्यातच आता जनावरांना देखील 'लम्पी स्किन' या संसर्गजन्य आजाराची लागण होत आहे. त्यामुळं मानावासोबतच जनावरांनादेखील सोशल डिस्टन्सिंग पाळावं लागणार आहे.

now animals have to keep social distanc due to Lumpy skin disease
‘लम्पी स्किन’मुळे आता जनावरांनाही पाळावं लागणार सोशल डिस्टन्सिंग

नांदेड - जगभरात करोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या संसर्गाने मृत्यूचा आकडादेखील लाखाच्या घरात गेला आहे. त्यातच आता जनावरांना देखील 'लम्पी स्किन' या संसर्गजन्य आजाराची लागण होत आहे. त्यामुळं मानावासोबतच जनावरांनादेखील सोशल डिस्टन्सिंग पाळावं लागणार आहे.


लम्पी स्किन या आजारामुळे जनावरांच्या शरीरावर फोड येतात. गोचीड आणि गोमाशीसारखे किटक आजारी जनावरांचा चावा घेऊन इतर जनावरांकडे त्याचा प्रसार करतात. लम्पी स्किन हा आजार मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्व भागात आहे. मात्र, वातावरणातील वाढत्या आद्रतेमुळ त्याचा प्रसार वाढत आहे. यामुळे शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही जनावरे दगावल्याचेदेखील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

‘लम्पी स्किन’मुळे आता जनावरांनाही पाळावं लागणार सोशल डिस्टन्सिंग
हा आजार संसर्गजन्य असला तरी त्याची लागण मानवाला होत नाही. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांवर उपचार करावेत असे आवाहन पशुवैद्यकीय सर्व चिकिस्थालय सहाय्यक आयुक्त एस.एस.काटकमवार यांनी केले आहे.
‘लम्पी स्किन’मुळे आता जनावरांनाही पाळावं लागणार सोशल डिस्टन्सिंग


लम्पी स्किनची लक्षणं-

जनावरांना मोठे फोड येतात. नाक व तोंडातून चिकट द्रव्य बाहेर पडते. काहीवेळा जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते. जनावरं चारा खात नाहीत. लम्पी स्किन हा आजार गोवंशामध्ये आढळण्याचे प्रमाण ३० टक्के इतके आहे. तर म्हेस वर्ग प्राण्यांमध्ये दीड ते दोन टक्के इतकं आहे. तर विशेष करून संकरीत गाई आणि वासरांना हा आजार होन्याचे प्रमाण जास्त आहे.

उपाय-
लम्पी स्किन हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळं सर्वप्रथम लागण झालेल्या जनावरांना विलगिकरन करावे. कीटक हे प्रसार वाढवण्याचं माध्यम आहे. त्यासाठी जनावरं बांधत असलेल्या जागेची स्वच्छता करावी. लागण झालेल्या जनावरांना किटकांपासून बचावासाठी निंबोळीअर्क, करंजतेल आणि दोन टक्के साबणाचं मिश्रण एक लिटर पाण्यात तायर करून त्याची फवारणी जनावरांवर करावी. यामुळं गोचीड आणि गोमाशी जनावरांपासून दूर राहते.

Last Updated :Aug 8, 2020, 6:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details