महाराष्ट्र

maharashtra

विशेष : रेल्वेच्या नांदेड विभागातील बनविलेल्या 'बोगी' वापराची शक्यता धूसर..!

By

Published : Dec 23, 2020, 4:58 PM IST

Updated : Dec 23, 2020, 5:21 PM IST

नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने 22 बोगी तयार करून ठेवल्या आहेत. पण गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने ह्या बोगीची भविष्यात गरज भासेल, ही शक्यता धूसर मानली जात आहे.

railway
railway

नांदेड - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना भविष्यात विविध ठिकाणी कोविड सेंटर अनेक ठिकाणी सुरू करण्यात आले होते. यात रेल्वे विभागाने पुढाकार घेतला होता. नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने 22 बोगी तयार करून ठेवल्या आहेत. पण गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने ह्या बोगीची भविष्यात गरज भासेल, ही शक्यता धूसर मानली जात आहे.

नांदेड कोविड सेंटर्स

नांदेड जिल्ह्यात शहरासह विविध तालुक्यात कोविड सेंटर यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत), मुखेड कोविड रुग्णालय, देगलूर कोविड रुग्णालय, हदगाव कोविड रुग्णालय, किनवट कोविड रुग्णालय, नांदेड मनपाअंतर्गत गृह विलगीकरण, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण, विविध खासगी रुग्णालय येथे कोविड सेंटर आहेत.

सद्यस्थितीत रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 163, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 75 एवढी आहे.

रेल्वे विभागाकडून माहिती लपवली जात आहे?

दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने २२ बोगीमध्ये आयसोलेशन व कोविड सेंटर बनविले. या बोगीमध्ये एकूण ७२ प्रवासी करत असतात. पण रुग्णांच्या दृष्टीने वेगळे नियोजन करावे लागले असते. रेल्वे विभागाने कोविड सेंटर तयार केले असले तरी कोरोना रुग्णाची संख्या घटल्यामुळे राज्य शासनाकडून मागणी आली नाही. या आरोग्य यंत्रणेची गरज भासली नाही. सुदैवाने ती वेळ आली नाही हे चांगले आहे. पण रेल्वे विभागाकडे संबंधित माहिती लपविल्याचे दिसून येत आहे. नेमके या बोगी पाहण्यासाठी व प्रतिक्रिया देण्यासाठी रेल्वे विभागाने टाळले. त्या शंके-कुशंकेला वाव मिळत आहे. नेमका खर्च किती झाला? सध्या अवस्था कशी आहे. नेमके माहिती का लपविली जात आहे. हे प्रश्न उपस्थित होत असून याबाबत वरिष्ठ स्तवरून चौकशी करणे आवश्यक आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविडबाधितांची संक्षिप्त माहिती (२२ डिसेंबर २०२०)

  • एकूण घेतलेले स्वॅब - 1 लाख 72 हजार 442,
  • एकूण निगेटिव्ह स्वॅब - 1 लाख 47 हजार 216
  • एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 21 हजार 149
  • एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 20 हजार 75
  • एकूण मृत्यू संख्या - 565
  • उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.92 टक्के
  • आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या -1
  • आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - 5
  • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - 474
  • रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 312
  • आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले - 15
Last Updated : Dec 23, 2020, 5:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details