महाराष्ट्र

maharashtra

Ashok Chavan leaving Congress : अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार? पाहा काय दिले स्पष्टीकरण

By

Published : Aug 2, 2022, 9:48 AM IST

काँग्रेस नेते अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याची जिल्हाभरात चर्चा आहे ( Talks of Ashok Chavan leaving Congress ) . मात्र, चव्हाण यांनी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. चर्चेला काही महत्त्व नाही. असा कुठलाही निर्णय मी घेतला नाही, अशी प्रतिक्रिया देत अशोक चव्हाण यांनी याबाबत अधिक बोलणं टाळलं. बहुमत चाचणीच्या वेळी अशोक चव्हाण अनुपस्थितीत होते. त्यावरून काँग्रेस पक्षातूनच त्यांची कोंडी केली जात आहे, त्यामुळे अशोक चव्हाण नाराज असल्याचं म्हटलं गेलं. याच पार्श्वभूमीवर चव्हाण पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. मात्र ही चर्चा स्वतः अशोक चव्हाण यांनीच फेटाळून लावली आहे.

Ashok Chavan leaving Congress
अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार ?

नांदेड -राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. एकनाथ शिंदेंसह 50 आमदारांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले ( Mahavikas Aghadi government collapsed ). या सरकारमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप या आमदारांनी केला. मात्र, या घडामोडींपाठोपाठ आणखी एक चर्चा चांगलीच रंगलेली दिसली ( Talks of Ashok Chavan leaving Congress ). ती म्हणजे काँग्रेस नेते अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याची. यावर आता चव्हाणांनी स्वतःच उत्तर दिले आहे.

बहुमत चाचणीदिवशी सभागृहात गैरहजर -अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे विधानसभेतील तब्बल ११ आमदार बहुमत चाचणीदिवशी सभागृहात गैरहजर ( absent from hall on floor test day ) होते. यानंतर या आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काँग्रेस हायकमांडनेही पक्षशिस्त मोडल्याच्या आरोपाखाली या ११ आमदारांवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे, अशोक चव्हाण पक्ष सोडणार ( Ashok Chavan leaving Congress ) असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या. मात्र अशोक चव्हाणांनी या चर्चा फेटाळून लावल्या ( Ashok Chavan Rejected discussions of leaving congress ) आहेत. मी असा कुठलाही निर्णय घेतला नाही, ( not taken any discussion of leaving congress ) असे उत्तर त्यांनी दिले आहे.

अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार ?

पक्ष सोडणार असल्याची चर्चा - काँग्रेस नेते अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याची जिल्हाभरात चर्चा आहे. मात्र, चव्हाण यांनी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. चर्चेला काही महत्त्व नाही. असा कुठलाही निर्णय मी घेतला नाही, अशी प्रतिक्रिया देत अशोक चव्हाण यांनी याबाबत अधिक बोलणं टाळलं. बहुमत चाचणीच्या वेळी अशोक चव्हाण अनुपस्थितीत होते. त्यावरून काँग्रेस पक्षातूनच त्यांची कोंडी केली जात आहे, त्यामुळे अशोक चव्हाण नाराज असल्याचं म्हटलं गेलं. याच पार्श्वभूमीवर चव्हाण पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. मात्र ही चर्चा स्वतः अशोक चव्हाण यांनीच फेटाळून लावली आहे.

हेही वाचा -Al Qaeda leader death : सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात अलकायदाचा दहशतवादी अल-जवाहरी अफगाणिस्तानात ठार

ABOUT THE AUTHOR

...view details