महाराष्ट्र

maharashtra

Fire due to Beedi अख्खं कुटुंब संपण्याला कारण ठरली एक रुपयाची बिडी

By

Published : Aug 11, 2022, 9:50 AM IST

सूर्यकांत सक्रप्पा हे आपल्या पत्नी आणि मुलासह बल्लूर गावात वास्तव्यास ( Ballur fire case ) होते. तर शेतीची कामे सुरु असल्याने पिकांवर फवारणी करण्यासाठी त्यांनी फवारणी टॅंक आणली होती. त्यासाठी त्यात पेट्रोल सुद्धा भरून ठेवेले ( deaths due to beedi fire ) होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याला कारण मिळाले.

Fire incident in Nanded
Fire incident in Nanded

नांदेड-जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील बल्लूर या गावात एक घटना समोर ( Nanded fire incident ) आली आहे. एक रुपयाच्या बिडीने अख्खे कुटुंब संपवले आहे. बिडी पिऊन झाल्यावर ती घरातील फवारणी करणाऱ्या टाकीवर फेकल्याने आतमध्ये असलेल्या पेट्रोलचा भडका उडून घरातील तिघांचा मृत्यू ( 3 deaths due to Beedi ) ) झाला आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत सूर्यकांत माधवराव सक्रप्पा (वय 52 वर्षे), गुबाई सूर्यकांत सक्रप्पा (वय50 वर्षे) आणि मुलगा कपिल सूर्यकांत सक्रप्पा (वय 20 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे.

सूर्यकांत सक्रप्पा हे आपल्या पत्नी आणि मुलासह बल्लूर गावात वास्तव्यास ( Ballur fire case ) होते. तर शेतीची कामे सुरु असल्याने पिकांवर फवारणी करण्यासाठी त्यांनी फवारणी टॅंक आणली होती. त्यासाठी त्यात पेट्रोल सुद्धा भरून ठेवेले ( deaths due to beedi fire ) होते. दरम्यान 7 ऑगस्ट रोजी सूर्यकांत सक्रप्पा आणि त्यांची पत्नी व मुलगा नेहमीप्रमाणे घरात बसले होते. सूर्यकांत यांना बिडी पिण्याची सवय असल्याने त्यांनी बिडी पेटवली. त्यांनतर बिडी संपणार असल्याने पेटती बिडी घराबाहेर फेकण्याचा प्रयत्न केला.

तिघांचा मृत्यूबिडी घरात असलेल्या फवारणी टॅंकमध्ये जाऊन पडली. टॅंकमध्ये पेट्रोल असल्याने जोराचा भडका झाला. पाहता-पाहता मोठा स्फोट झाला. सूर्यकांत यांच्यासह पत्नी गुबाई आणि मुलगा कपिल यांच्यावर आगीचा भडका जाऊन पडला. आग एवढी भयंकर होती की यात तिघेही गंभीर भाजले गेले. देगलूरच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना विष्णुपुरी नांदेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना अखेर आज तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे एक रुपयाच्या बिडीने अख्खं कुटुंब उध्वस्त केले आहे.

हेही वाचा-Tata Mumbai Marathon तीस वर्षे धावल्यावर मुख्यमंत्री झालो, एकनाथ शिंदे यांची तुफान फटकेबाजी

ABOUT THE AUTHOR

...view details