महाराष्ट्र

maharashtra

नागपूर- कोरड्या नदीत पाण्याचे लोट, मोवाडवासी सुखावले

By

Published : Jul 30, 2019, 3:13 PM IST

वर्धा नदी गेल्या दोन वर्षापासून कोरडीठाक पडल्यामुळे कधी काळी महापुराच्या पाण्यामुळे सर्वस्व गमावलेल्या मोहाडमध्ये पाण्याचे संकट निर्माण झाले होते. मात्र, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे कोरड्या वर्धा नदीच्या पात्रात पाण्याचे लोट वाहू लागले.

नदीत पाण्याचे लोट

नागपूर - पावसाच्या दगाबाजीचा सर्वाधिक फटका बसलेल्या नागपूर जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून पावसाच्या सरी बेधुंद बरसू लागल्या आहेत. जल प्रकल्प, धरणातील पाणीसाठा अद्यापही वाढला नसल्याने निराशेच्या सवाटाखाली गेलेल्या नागपूर जिल्ह्यात पावसामुळे आशादायी चित्र बघायला मिळाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरड्या पडलेल्या नदीत जलभरणा झाल्याने हा आनंददायी क्षण अनेकांनी आपल्या डोळ्यात तर काहींनी मोबाईलमध्ये कैद केले आहे.

नदीच्या पात्रात जमा झालेले पाणी पाहायला ग्रामस्थांमध्ये उत्सुकता


28 वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गाव पावसाच्या पुरात वाहून गेले होते. त्यावेळी आलेल्या महापुरात शेकडोंना जलसमाधी मिळाली होती. त्या घटनेच्या आठवणी मोवाड वासियांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. ज्या नदीच्या पुरात मोवाड वाहून गेले, ती वर्धा नदी गेल्या दोन वर्षापासून कोरडीठाक पडली होती. यामुळे कधी काळी महापुराच्या पाण्यामुळे सर्वस्व गमावलेल्या मोहाडमध्ये पाण्याचे संकट निर्माण झाले.


मोवाडवासींना जलसमाधी घडविणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात पाणी नसल्यामुळे मोवाडसह परिसरातील गावात जलसंकट ओढावले, तसेच सिंचनाचा गंभीर प्रश्न देखील निर्माण झाला. पाण्याच्या मुद्यावर कोणतेच उपाय निघत नसल्याने निराशेच्या सवाटाखाली गेलेल्या मोवाडमध्ये नुकताच एक चमत्कार घडला आहे.


येथील गावकऱ्यांनी मोवाड फाउंडेशनच्या माध्यमातून वर्धा नदी खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले. यंदा पाऊस उशिरा बरसल्यामुळे वर्धा नदी कोरडीच होती. मात्र, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे कोरड्या वर्धा नदीच्या पात्रात पाण्याचे लोट वाहू लागले. हे पाहण्याचा मोह मोवाडवासींनाही आवरता आला नाही. तर, काहींनी हे क्षण मोबाईलमध्ये कैद करुन घेतले.

Intro:पावसाच्या दगाबाजीचा सर्वाधिक फटका बसलेल्या नागपूर जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून पावसाच्या सरी बेधुंद बरसू लागल्या आहेत....जल प्रकल्प,धरण,आणि डॅम मधील पाणीसाठा अद्यापही वाढला नसल्याने निराशेच्या सवाटाखाली गेलेल्या नागपूर जिल्ह्यात आज एक आशादायी चित्र बघायला मिळाले आहे.... गेल्या दोन वर्षांपासून कोरडी पडलेल्या नदीत जलभरणा झाला आहे.... हा आनंददायी क्षण अनेकांनी आपल्या डोळयात तर काहींनी मोबाईल मध्ये कैद केला आहे
Body:28 वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड हे अक्खे गाव वाहून गेले होते... त्यावेळी आलेल्या महापुरात शेकडोंना जलसमाधी मिळाली होती.... त्या घटनेच्या आठवणी मोवाड वासियांच्या मनात अजूनही ताज्या आहेत.... ज्या नदीच्या पुरात नागपूर मोवाड हे गाव वाहून गेलं होतं ती नदी गेल्या दोन वर्षापासून कोरडी होती...... कधी काळी महापुराच्या पाण्यामुळे सर्वस्व गमावलेल्या मोहाड मध्ये पाण्याचे संकट निर्माण झाले होते..... मोवाडवासींना जलसमाधी घडविणाऱ्या वर्धा नदीचं पाणी मिळत नसल्यामुळं मोवाडसह परिसरातील गावात जलसंकट ओढावलं होतं......एवढच नाही तर सिंचनाचा गंभीर प्रश्न सुद्धा निर्माण झाला......पाण्याच्या मुद्यावर कोणतेच उपाय निघत नसल्याने निराशेच्या सवाटाखाली गेलेल्या मोवाड मध्ये चमत्कार घडला आहे..... गावकऱ्यांनी मोवाड फाउंडेशनच्या माध्यमातून वर्धा नदी खोलीकरणाचं काम सुरू झाले..... यंदा पाऊस उशिरा बरसला त्यामुळं वर्धा नदी कोरडीच होती, मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळं कोरड्या वर्धा नदीपात्रात पाण्याचे लोट वाहू लागले. हे पाहण्याचा मोह मोवाडवासींनाही आवरता आला नाही. काहींनी हा क्षण मोबाईल मध्ये कैद केला.


Conclusion:null

ABOUT THE AUTHOR

...view details