महाराष्ट्र

maharashtra

Surgical Strike By Nagpur Traffic Police : बेशिस्त, मुजोर वाहनांचालकांवर नागपूर वाहतूक पोलिसांकडून सर्जिकल स्ट्राईक

By

Published : May 9, 2023, 6:18 PM IST

नागपूर शहरातील बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्याची मोहीम नागपूर वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. या मोहीमे अंतर्गत शहरातील अतिव्यस्त भागात वाहतूक विभाग उपायुक्त यांच्या नेतृत्वात सर्जिकल स्ट्राईक केली जाणार आहे. शहरातील सर्वचं सहा झोनकडे उपलब्ध असलेल्या टू-व्हीलर आणि फोर व्हीलर टोइंग व्हेईकलच्या मदतीने वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे वाहन टोइंग केले जात आहेत. त्यामुळे एका वेळी १० फोर व्हीलर आणि ७० ते ८० दुचाकी टोईंग केल्या जात असल्याची माहिती शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

Surgical Strike By Nagpur Traffic Police
बेशिस्त, मुजोर वाहनांचालकांवर नागपूर वाहतूक पोलिसांकडून सर्जिकल स्ट्राईक

वाहतूक विभाग उपायुक्त यांच्या नेतृत्वात सर्जिकल स्ट्राईक केली जाणार आहे.

नागपूर :नागपूर शहरातील इतवारी, गांधीबाग, मेडिकल, मेयो, पाचपावली, गोळीबार चौक सारख्या काही जुने नागपूरच्या भागात कायमचं वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत असते. या भागात सर्व प्रमुख बाजारपेठा असल्याने रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या नागपुरात निर्माण झाली आहे. अशा प्रकारच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी म्हणून नागपूर पोलिसांच्या वाहतूक विभागाने अतिव्यस्त भागात वाहतूक विभाग उपायुक्त यांच्या नेतृत्वात सर्जिकल स्ट्राईक केली जाणार आहे. या अंतर्गत रोज एकाद्या व्यस्त भागात एकाचं वेळी चहू बाजूने घेराबंदी करून बेशिस्त वाहन टो करून दंडात्मक कारवाई केली जात आहे.



शहरात १६ लाख दुचाकी तर २ लाखांपेक्षा अधिक चारचाकी वाहन :गेल्या दोन ते तीन दशकांमध्ये नागपूर शहराचा विस्तार अतिशय वेगात सुरू आहे. शहरीकरण झपाट्याने सुरू असल्याने दुचाकींसह चार चाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, नागपूर शहरात दुचाकींचा संख्या ही १६ लाख इतकी आहे तर चारचाकी वाहनां देखील अडीच लाखांच्या घरात आहे. याशिवाय ऑटो २५ हजार, बस यासह इतर वाहनांची संख्या देखील लक्षणीय आहे.


मध्यभारतातील सर्वाधिक दुचाकी नागपुरात :मध्यभारतातील सर्वात महत्वाचे शहर म्हणून नागपूरकडे बघितले जात असून माध्यभारतात सर्वाधिक दुचाकी विक्री देखील नागपुराचं होतं असली तरी शहरातील रस्त्यांची रुंदी अजूनही वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे नागपुरातील विविध बाजार परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसागणिक वाढतचं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details